Raj thackray : राज ठाकरेंचा जय श्रीराम नारा मनसेला नवसंजीवनी देणार? आयोध्या दौऱ्यात काय?

मराठीच्या मुद्यासोबतच हिंदू राष्ट्राच्या अजेंड्यावर स्वार होण्यासाठी नववर्षाच्या तोंडावर राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. गेल्याच महिन्यात जु्न्या आखाड्याच्या साध्वी कांचनगिरी यांनी कृष्णकुंजवर राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना अयोध्येचं निमंत्रण दिलं.

Raj thackray : राज ठाकरेंचा जय श्रीराम नारा मनसेला नवसंजीवनी देणार? आयोध्या दौऱ्यात काय?
raj thackeray

मुंबई : नववर्षाच्या तोंडावर राज ठाकरेंचा अयोध्या दौरा आयोजित करण्यात आला आहे. वर्षभरापूर्वी आपल्या पक्षाचा झेंडा बदलल्यानंतर हिंदुत्ववादाचा झेंडा हाती घेतल्याची झलक राज ठाकरेंनी दाखवली. मराठीच्या मुद्यासोबतच हिंदू राष्ट्राच्या अजेंड्यावर स्वार होण्यासाठी नववर्षाच्या तोंडावर राज ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. गेल्याच महिन्यात जु्न्या आखाड्याच्या
साध्वी कांचनगिरी यांनी कृष्णकुंजवर राज ठाकरेंची भेट घेऊन त्यांना अयोध्येचं निमंत्रण दिलं.

हिंदुत्वाच्या वातावरण निर्मितीसाठी निमंत्रण

खरंतर हिंदुत्ववादाच्या वातावरण निर्मितीसाठी कांचनगिरींना राज ठाकरेंच्या भेटीचं निमंत्रण मनसेनंच दिलं होतं. मुंबई विमानतळावर मनसे कार्यकर्त्यांनी कांचनगिरींचं जंगी स्वागतही केलं, मात्र जानेवारी 2020 मध्ये पक्षाचा झेंडा बदलतानाच मनसे आता हिंदुत्वाची पावलं टाकणार असल्याचे सुतोवाच राज ठाकरेंनी जाहीर केले होते.

अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा

अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौराही हौणार आहे..येणाऱ्या वर्षात राज्यात मुंबई, पुण्यासह 10 महत्त्वाच्या महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी राज ठाकरेंनी मोर्चेबांधणी सुरु केलीय. राज ठाकरेंचा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौरा असणार आहे. 6 डिसेंबरला राज ठाकरेंची पुण्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक होणार आहे. त्यानंतर 14 डिसेंबरला औरंगाबादेत संपूर्ण मराठवाड्यातल्या मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंची बैठक होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी राज ठाकरे पत्रकार परिषदही घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर 16 डिसेंबर रोजी पुण्यात संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील मनसे पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरेंची बैठक होणार आहे. पुण्यातही राज ठाकरे पत्रकारांशी संवाद साधतील. कोकण, उत्तर महाराष्ट्रात एक आणि विदर्भासाठी अमरावती आणि नागपुरातही राज ठाकरेंची मनसे पदाधिकाऱ्यांसोबत
बैठक होणार आहे. मात्र त्याची तारीख अद्याप ठरली नाहीये.

हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना टार्गेट

हिंदुत्ववादाच्या मुद्यावरुन भाजपकडून सातत्याने शिवसेनेला टार्गेट केलं जातं. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीचं सरकार असल्याने उघडपणे प्रखर हिंदुत्वाची भूमिका घेणंही शिवसेनेला अडचणीचं ठरत आहे. अशावेळी हिंदुत्वाच्या मुद्यावर स्वार होऊन मनसे पुन्हा एकदा उभारी घेण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे राज ठाकरेंचं जय श्री राम मनसेला नवसंजीवनी मिळवून देणार का? हे पाहावं लागेल.

Pakistan | क्रूरकर्मा पाकिस्तान ! श्रीलंकन नागरिकाला जमावाकडून अमानुषपणे मारहाण, भर रस्त्यात जाळलं, जगभरातून संतापाची लाट

Mpsc result : PSI पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर, मुख्य परीक्षा होणार 1 जानेवारी 2022 ला

Zodiac | सावधान! 2022 मध्ये 6 राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात संकट येणार, तुमची रास यामध्ये आहे का?

Published On - 10:25 pm, Fri, 3 December 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI