AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक का? राजेश टोपे म्हणतात…

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोना संसर्गाची माहिती दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढण्यामागील कारणंही सांगितली (Situation of Corona infection in Maharashtra).

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक का? राजेश टोपे म्हणतात...
| Updated on: Apr 11, 2020 | 11:44 PM
Share

मुंबई : राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील कोरोना संसर्गाची माहिती दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण वाढण्यामागील कारणंही सांगितली (Situation of Corona infection in Maharashtra). महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कोरोना चाचणी करणारं राज्य आहे. आजपर्यंत आपण महाराष्ट्रात 33 हजार चाचण्या केल्या आहेत. यात एकट्या मुंबईत 19 हजार चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या वाढणं साहजिक आहे, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं.

राजेश टोपे म्हणाले, “महाराष्ट्रातील कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या 1652 वर पोहचली आहे. ही जी एकंदर संख्या आपल्याला वाढलेली दिसते आहे ती संख्या वाढलेली आहे, मात्र त्यामागील पार्श्वभूमी देखील समजून घ्यावी लागेल. महाराष्ट्र हे देशात सर्वाधिक कोरोना चाचणी करणारं राज्य आहे. आजपर्यंत आपण महाराष्ट्रात 33 हजार चाचण्या केल्या आहेत. यात एकट्या मुंबईत 19 हजार चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे साहजिक आहे की आपण खूप चाचण्या केल्यानंतर एकही रुग्ण सुटत नाही.

आपण सर्व प्रोटोकॉल पाळत चाचण्या घेतल्या आहेत. आपण थ्री टी म्हणजेच ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट अशा पद्धतीने काम करत आहोत. संशयित रुग्णांचं ट्रेसिंग करताना महाराष्ट्राने लाखोंच्या संख्येने लोक शोधली आणि त्यांची टेस्टिंग केली आहे. यामुळे आपल्याकडे संख्या वाढलेली दिसते. परंतू यातली जमेची बाजू म्हणजे यातील 70 टक्के रुग्ण अत्यंत सामान्य स्थितीत आहेत. यातील 5 टक्के गंभीर आहेत. बाकीचे मधल्या रुग्णांना साधारण लक्षणं दिसत असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, असंही राजेश टोपे यांनी नमूद केलं.

“मुंबई, पुणे आणि ठाणे पालघर परिसरातच 91 टक्के रुग्ण”

राजेश टोपे म्हणाले, “रुग्णांच्या संख्येतील वाढ 13 टक्के आहे. त्याची कारणं वरील प्रमाणे आहेत. हे रुग्ण साधारणपणे मुंबई, पुणे आणि ठाणे पालघर परिसरातच आहेत. त्याचं प्रमाण 91 टक्के आहे. एकट्या मुंबईत 61 टक्के आहेत, पुण्यात 20 टक्के आहेत. उर्वरित 9 टक्के ठाणे आणि पालघर भागात आहेत. या 3 भागाच्या व्यतिरिक्त महाराष्ट्रात 9 टक्के रुग्ण आहेत. आपला मृत्यूदर 5.5 टक्के इतका आहे.”

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम सुरु आहे. रुग्णालयांमध्ये आपण तीन प्रकार करतो आहोत. एक कोविड केअर सेंटर. यात 100 सामान्य स्थितीतील रुग्ण असतील. दुसऱ्या प्रकारचं रुग्णालय कोविड हेल्थ सेंटर असेल. त्यात माईल्ड स्वरुपाचे रुग्ण ठेवले जातील. तिसऱ्या कोविड रुग्णालयात गंभीर स्वरुपाचे रुग्ण असतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे:

  • केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे PPE, मास्क मुबलक प्रमाणात देण्याची मागणी केली आहे.
  • मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांसमोर पूल टेस्टिंग संकल्पना राज्याच्यावतीने मांडली. अमेरिकेतील महाराष्ट्राच्या डॉक्टरांनी त्यांचा अभ्यास करून हे मांडलं आहे.यासाठी केंद्राने आपल्या राज्याला परवानगी द्यावी. आपले स्वॅब नमुने घेतले जातात, यात वेळ जातो. एकत्र स्वॅब नमुने घेतल्यास सगळ्यांची टेस्ट घेणं सहज शक्य आणि अहवाल निगेटीव्ह आला तर फायदा होतो.
  • ग्रीन भागत काही नाही तिथे बॉर्डर सील करुन काही मार्गदर्शक सूचना देता येतील. या ग्रीन भागात सोशल डिस्टन्सिंग ठेऊन काम झाल्यास कंपन्या सुरु करता येतील.
  • संपूर्ण देशात रेड, ऑरेंज, ग्रीन झोन राहतील. 15 केस रेड, 15 पेक्षा कमी ऑरेंज, ग्रीन म्हणजे केस नाही. याबाबत गाईडलाईन 1-2 दिवसात सांगितली जाईल.
  • देशात ज्या पद्धतीने संख्या वाढते आहे ते लक्षात घेता पूर्ण देशात एकच निर्णय घेण्याची गरज आहे. त्यामुळे पूर्ण देशासाठी लॉकडाऊन वाढवण्यासंदर्भात विचार करण्यात आला आहे. कारण लॉकडाऊन संदर्भात वेगवेगळे निर्णय घेता येत नाही. काटेकोर लॉकडाऊन पाळल्यानंतरच येणाऱ्या काळात कोरोनावर मात करता येणार नाही.
  • लॉकडाऊनच्या काळात लोकांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा व्हावा त्यासाठी स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे. तसे आदेश देण्यात आले आहेत. रेपीड टेस्ट करणे शक्य आहे. सरकार लोकापर्यंत पोहचत आहे.
  • पुरेशी यंत्रणा आणि साधन सामुग्री सरकारकडे उपलब्ध आहे.

संबंधित बातम्या :

Maharashtra extends lockdown : वाढवलेल्या लॉकडाऊनमधून कुणाकुणाला सूट?

‘नहीं पहनोगे मास्क तो, मुर्गा बनकर करोगे नागिन डान्स’, मुंबई पोलिसांचं ‘मुर्गा अभियान’

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे

लॉकडाऊनबाबत महत्त्वाची बैठक, मोदी-मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील 10 मुद्दे

Corona : चेंबूरमध्ये 9, तर दादरमध्ये 5 नवे कोरोनाबाधित, 56 जणांना क्वारंटाईन

पुणे, ठाणे, नागपुरात कोरोनाचे रुग्ण वाढतेच, राज्यात कुठे किती नवे रुग्ण?

Situation of Corona infection in Maharashtra

लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.