AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजकोट किल्ल्यावर मविआ अन् भाजपमध्ये राडा, आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा फोन

राजकोट किल्ल्यावर आंदोलन सुरु आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. काय चाललेले आहे, कसे चालले आहे. त्याची विचारणा केली. त्याठिकाणी किती भ्रष्टाचार झाला ते पाहून या. म्हणजे भाजपचा भ्रष्टाचार देशभरासमोर मांडता येईल, असे उद्धव ठाकरे यांनी विचारले.

राजकोट किल्ल्यावर मविआ अन् भाजपमध्ये राडा, आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे यांचा फोन
राजकोट किल्ल्यावर आंदोलन
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Aug 28, 2024 | 1:17 PM
Share

सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले. त्याठिकाणी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि भाजप कार्यकर्ते यांच्यात राडा झाला. यावेळी शिवसेना उबाठा नेते आदित्य ठाकरे यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला. आदित्य ठाकरे राजकोट किल्ल्यावर धरणा देत असताना उद्धव ठाकरे यांनी फोन करुन त्यांना हिंमत दिली. मुख्य प्रवेशद्वारावर नारायण राणे आणि त्यांचे समर्थक थांबून आहे. त्याच ठिकाणावरुन किल्ल्यावर जाण्याची मागणी महाविकास आघाडीचे नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राजकोट किल्ल्यावर तणाव निर्माण झाला आहे.

आदित्य ठाकरे यांना उद्धव ठाकरे काय म्हणाले

राजकोट किल्ल्यावर आंदोलन सुरु आहे. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी माहिती घेतली. काय चाललेले आहे, कसे चालले आहे. त्याची विचारणा केली. त्याठिकाणी किती भ्रष्टाचार झाला ते पाहून या. म्हणजे भाजपचा भ्रष्टाचार देशभरासमोर मांडता येईल. आम्ही शिवसैनिक आहोत. आम्ही घाबरणार नाही, अशी हिंमत देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फोन केला, असे आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. पोलिसांनी आदित्य ठाकरे यांची सुरक्षा वाढवली आहे.

आदित्य ठाकरे आंदोलनावर ठाम

नारायण राणे समर्थकांनी किल्ल्याचा मुख्य दरवाजा दीड तासापासून अडवून धरला होता. त्यानंतर त्यांनी हा दरवाजा मोकळा करण्यास सुरुवात केली. भाजप आणि मविआमध्ये सुरु असलेला वाद मिटवण्यासाठी जयंत पाटील किल्ल्यावर दाखल झाले. त्यांनी नितेश राणे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी वैभव नाईक आणि आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा केली. दुसरीकडे आदित्य ठाकरे आंदोलनावर ठाम आहे. जोपर्यंत भाजप कार्यकर्ते किल्ल्यातून बाहेर पडणार नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरु राहणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. राणे आणि त्यांचे समर्थक निघून गेल्यावर आम्ही त्याठिकाणी जाऊ, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

दोन्ही बाजूने आपण वेळ घेतली असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीतर्फे आज मोर्चाही काढण्यात येणार आहे. मालवणमध्ये हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

Follow Us
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन