AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रातील असा एक लपलेला गड, जिथे राम आणि सीता येऊन गेले… दर्शनानंतर सर्व इच्छा होतील पूर्ण

नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भव्य उत्सवाचे आयोजन केले जाते. देवीच्या दर्शनासाठी केवळ अकोला जिल्ह्यांतूनच नाही, तर दूरदूरच्या भागांतून भाविकांची अलोट गर्दी होते. या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना भक्तीभावाने ३६० पायऱ्यांची चढाई करावी लागते.

महाराष्ट्रातील असा एक लपलेला गड, जिथे राम आणि सीता येऊन गेले... दर्शनानंतर सर्व इच्छा होतील पूर्ण
| Updated on: Sep 27, 2025 | 2:52 PM
Share

नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यात असलेल्या रुद्रायणी देवीचा गड भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू बनला आहे. अकोला शहरापासून अवघ्या ५० किलोमीटरवर असलेला हा गड आपल्या नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक महत्त्वामुळे नाशिकच्या सप्तशृंगी गडासारखा अनुभव देतो. या प्राचीन देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना तब्बल ३६० पायऱ्या चढाव्या लागत आहे.

चिंचोली गावानजीक एका उंच पहाडावर रुद्रायणी देवीचा निवास आहे. हा परिसर सभोवतालच्या निसर्गाने नटलेला असल्याने, गडावरून दूरदूरपर्यंतचे निसर्गरम्य आणि विहंगम दृश्य पाहण्यासाठी मिळते. निसर्गाची ही सुंदर छटा भाविकांना वेगळी शांती आणि ऊर्जा देते. स्थानिक परंपरेनुसार, हे मंदिर अतिशय पुरातन आहे. देवीची मूर्तीसुद्धा दगडी आणि प्राचीन आहे. तिच्या दर्शनासाठी ठिकठिकाणाहून हजारो भक्त वर्षातून अनेकवेळा येत असतात. या देवीला साकडं घातल्यास मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची दृढ श्रद्धा आहे.

धार्मिक महत्त्व प्राप्त

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या मंदिराच्या इतिहासाबाबत एक अनोखी आख्यायिका सांगितली जाते. त्रेतायुगात प्रभू राम आणि सीता या ठिकाणी दोन वेळा येऊन गेल्याचे मानले जाते. यामुळे या स्थळाला एक वेगळे धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भव्य उत्सवाचे आयोजन केले जाते. देवीच्या दर्शनासाठी केवळ अकोला जिल्ह्यांतूनच नाही, तर दूरदूरच्या भागांतून भाविकांची अलोट गर्दी होते. या देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांना भक्तीभावाने ३६० पायऱ्यांची चढाई करावी लागते.

चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण

पायऱ्या चढून गडावर पोहोचल्यावर होणारे रुद्रायणी मातेचे दर्शन, हा अनुभव भाविकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि समाधानकारक असतो. पायथ्याशी नऊ दिवस मोठी यात्रा भरते, ज्यामुळे संपूर्ण परिसरात चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण तयार होते. भक्ती, निसर्गरम्यता आणि ऐतिहासिक वारसा यांचा संगम म्हणून या गडाला ओळखले जाते. अकोल्यातील रुद्रायनी मातेचा गड हा या नवरात्रोत्सवातील मुख्य श्रद्धास्थान मानला जातो.

नऊ दिवस उत्साहाचे वातावरण

दरम्यान अकोला जिल्ह्याच्या धार्मिक आणि सामाजिक जीवनात नवरात्रोत्सवाचे स्थान खूप मोठे आहे. शहरातील विविध मंदिरे आणि ग्रामीण भागातील शक्तीपीठांवर नऊ दिवस उत्साहाचे वातावरण असते. या काळात केवळ रुद्रायणी मातेचा गडच नव्हे, तर शहरातही मोठे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. मात्र, रुद्रायणी मातेच्या गडावर असलेले हे अनोखे ऐतिहासिक आणि नैसर्गिक पावित्र्य आहे. हा गड अकोला जिल्ह्याच्या नवरात्रोत्सवाचे एक मुख्य आणि अविभाज्य प्रतीक बनला आहे. या काळात अकोला जिल्ह्यातील भक्तांची श्रद्धा आणि उत्साह खऱ्या अर्थाने शिगेला पोहोचलेला दिसतो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...