थोडे दिवस थांबा, माझ्याकडे मसाला आहे; तुम्हाला सगळं दाखवतो, रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंना इशारा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवाजी पार्कवर सरकारविरोधात रॅली काढली. यावेळी त्यांनी सावली बारचा उल्लेख केला याला रामदास कदम यांनी उत्तर दिले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज शिवाजी पार्कवर सरकारविरोधात रॅली काढली. ज्यामध्ये त्यांनी राज्य सरकारच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि सावली बारचा उल्लेख केला. सावली बारवरील उद्धव ठाकरेंच्या आरोपांनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंना चोख प्रत्युत्तर दिले. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रामदास कदमांचे उद्धव ठाकरेंना उत्तर
सावली बारचा करारपत्र दाखवताना शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले की, सावली बारच्या बाबतीमध्ये डॉक्युमेंट आणि एग्रीमेंट ची कॉपी माझ्याकडे आहे. शेट्टी नावाच्या व्यक्तीसोबत आपण एग्रीमेंट केलेले आहे. कलम सहा आणि सात मध्ये स्पष्ट म्हटलंय की, कोणताही बेकायदेशीर धंदा ते सदर जागेतून चालवणार नाहीत आणि केवळ यामध्ये दिलेल्या नियमांनुसार हॉटेलचा धंदा सदर जागेतून चालवतील.
गेले 30 वर्ष हे हॉटेल आहे. योगेश कदम काल राज्यमंत्री झाले आहे. शेट्टीना यांना हॉटेल चालवायला दिले त्यांनी नियम मोडले असं जेव्हा पोलिसांकडून आम्हाला कळलं, तेव्हा आम्ही तात्काळ 12 जूनला हे दोन्ही लायसन्स ऑर्केस्ट्रा आणि बारचे रद्द करून टाकले आहेत. नैतिकता म्हणून ताबडतोब त्या शेट्टीला मी बाहेर काढलं. दोन्ही लायसन्स पोलिसांकडून सबमिट करून टाकले असंही कदम यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंनी माझ्यावर अन्याय केला – कदम
पुढे बोलताना रामदास कदम म्हणाले की, ‘मला वाटतं उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदा स्वतःच आत्मपरीक्षण केलं पाहिजे. उद्धव ठाकरे ना एक चांगल्या डॉक्टरची आवश्यकता आहे. मी शिवसेनेमध्ये असताना बाळासाहेब गेल्यानंतर माझ्यावरती प्रचंड अन्याय केला. माझं मंत्रीपद काढून आपल्या मुलाला दिलं. बाप मुख्यमंत्री भेटा मंत्री. माझी आमदारकी काढून घेतली.’
थोडे दिवस थांबा माझ्याकडे मसाला आहे…
पुढे बोलताना कदम म्हणाले की, ‘उद्धवजी तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी तुमच्याकडून रामदास कदमचा केस देखील वाकडा होणार नाही. थोडे दिवस थांबा अनेक गोष्टी मी काढणार आहेत. थोडे दिवस थांबा माझ्याकडे मसाला आहे. मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे, चिंता करू नका.
