राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे, असा ठरला विस्ताराचा ‘फॉर्मूला’

rss and bjp relation: लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर संघाकडून पावले उचलण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून आमदारांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. या आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचे वारे, असा ठरला विस्ताराचा 'फॉर्मूला'
देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांचा फोटोImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Jun 17, 2024 | 7:18 AM

लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) 400 पारचा नारा दिला. परंतु एनडीएला 300 पार करता आले नाही. भाजपला स्वबळावर बहुमत मिळाले नाही. भाजपला सर्वाधिक फटका महाराष्ट्र, उत्तर प्रदेश अन् पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये बसला. महाराष्ट्रात झालेल्या पराभवावर विचारमंथन राज्यातील भाजप नेत्यांनी सुरु केले आहे. राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन रणनीती तयार केली जात आहे. त्यासाठी आधी मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत तिन्हीपक्षाचे एकमत आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार करुन आमदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आहे. मत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त आणि तारीख पुढच्या आठवड्यात ठरणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत केंद्रातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ग्रीन सिग्नल मिळाले आहे. या विस्तारात ७-५-२ असा फॉर्मुला ठरल्याची प्राथमिक माहिती आहे. विस्तारात शिवसेना शिंदे गटातील रिक्त मंत्रीपद शिंदेंकडेच राहणार आहे. संदीपान भुमरेंचा जागी संजय शिरसाट यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

काय आहे संघाची रणनीती

लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाल्यानंतर संघाकडून पावले उचलण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संघाकडून आमदारांची कार्यशाळा घेतली जाणार आहे. या आठवड्यात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने संघाकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यासाठी पुण्यात आमदाराच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील महत्त्वाच्या आमदारांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून विधानसभेचा आढावा घेण्यात येणार आहे. लोकसभेसारखी परिस्थिती विधानसभेत होऊ नये, यासाठी संघाने पावले उचलली आहे.

संघाकडून भाजपवर जाहीर टीका

लोकसभा निवडणूक निकालानंतर संघाकडून भाजपला सार्वजनिकरित्या खडेबोल सुनावले जात आहेत. सरसंघचालक मोहन भागवत यांनी मणिपूरचा विषय काढला. त्यानंतर अजित पवार यांनी सोबत घेतल्यासंदर्भात संघाकडून प्रश्न उपस्थित झाला. तसेच अंहकारी पक्षाला 241 जागांवर रोखले, असे वक्तव्य संघाकडून झाले होते. त्यासंदर्भात विरोधकही आता भाजपला घेरत आहेत. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता आमदारांची कार्यशाळा संघाकडून घेण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार

राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याची चर्चा आहे. हा विस्तार करताना आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन करण्यात येणार आहे. भाजपमधून संधी देताना संघाचा सल्ला घेतला जाण्याची शक्यता आहे. भाजप, शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छूक आहे. आता शेवटच्या टप्प्यात तरी मंत्रिपद मिळावे, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.