AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मित्रांसोबत पोहायला गेलेला ‘तो’ परतलाच नाही, 12 तासानंतर अग्निशमन दलानं शोधला मृतदेह

12 तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना रवींद्र मेडी याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.(Ravindra Medi Nalasopra East)

मित्रांसोबत पोहायला गेलेला 'तो' परतलाच नाही, 12 तासानंतर अग्निशमन दलानं शोधला मृतदेह
नागले तलाव
| Updated on: Jan 17, 2021 | 11:54 AM
Share

पालघर: वसई विरार महापालिका क्षेत्रातील नालासोपारामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. नालासोपारामधील पूर्व नागले तलावात 17 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. 12 तासानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना मुलाचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे. रवींद्र मेडी असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. तो नालासोपारा पूर्वमधील संख्येश्वरनगरमधील रहिवासी होता. ( Ravindra Medi drowned in Nalasopara East Nagale lake)

12 तासानंतर मृतदेह सापडला

रवींद्र मेंडी त्याच्या इतर दोन मित्रांसह नालासोपारा पूर्वमधील नागले तलावात पोहण्यासाठी गेला होता. शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास रवींद्र मेडी नागले तलावात पोहण्यासाठी गेला होता. दुपारी 3 वाजता रवींद्र मेडी हा पोहत असताना बुडाला होता. त्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. तब्बल 12 तासानंतर मृतदेह सापडला.

रवींद्र मेडी असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो नालासोपारा पूर्व संख्येश्वर नगर येथील रहिवासी आहे. शनिवारी दुपारी 1 च्या सुमारास तो आणि इतर 2 मित्र नागले तलावावर पोहायला गेले होते. 3 च्या सुमारास यातील रवींद्र मेडी हा पोहत असताना बुडाला होता. रवींद्र मेडी तलावात बुडाल्यानंतर महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला होता. नागले तलावात रवींद्र मेडीचा शोध लागला नव्हता, अखेर आज ( 17 जानेवारी) सकाळी साडे नऊच्या सुमारास हा मृतदेह मिळाला आहे. (Ravindra Medi drowned in Nalasaopara East Nagale lake )

वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाकडून शोध मोहीम

नागले तलावामध्ये 17 वर्षीय मुलगा बुडाल्याची माहिती मिळाल्यानंतर वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. अग्निशमन दलानं शनिवारी रवींद्र मेडीचा शोध घेतला. मात्र, अग्निशमन दलाला रवींद्र मेडीचा शोध लागला नव्हता. आज सकाळी पुन्हा एकदा शोधकार्य राबवल्यानंतर सकाळी साडे नऊच्या सुमारास रवींद्र मेडीचा मृतदेह मिळाला आहे. यावेळी तलावाच्या परिसरसातील नागरिकांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले.

संबंधित बातम्या:

Police Suicide | सरकारी रिव्हॉल्वरने डोक्यात गोळी झाडून पोलिसाची आत्महत्या

गँगरेपने नालासोपारा हादरलं, मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

(Ravindra Medi drowned in Nalasopara East Nagale lake)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.