AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता राजीनामा झालाच पाहिजे, व्हिडीओ व्हायरल करा, अभिजित दीपकेंच्या टार्गेटवर हे मोठं नाव; तरुणांना सांगितला प्लॅन!

सीजेपीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पुन्हा एकदा दंड थोपाटले आहेत. एमपीएससीचे वरिष्ठ अधिकारी भिमनवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. तसेच पुढे काय करायचं? हा प्लॅन देखील सांगितला आहे.

आता राजीनामा झालाच पाहिजे, व्हिडीओ व्हायरल करा, अभिजित दीपकेंच्या टार्गेटवर हे मोठं नाव; तरुणांना सांगितला प्लॅन!
आता राजीनामा झालाच पाहिजे, व्हिडीओ व्हायरल करा, अभिजित दीपकेंच्या टार्गेटवर हे मोठं नाव; तरुणांना सांगितला प्लॅन!Image Credit source: TV9 Network
| Updated on: Sep 16, 2026 | 8:15 PM
Share

एमपीएससी परीक्षेतील कथित घोटाळा, नवीन नंबर प्लेटमधील गैरव्यवहार आणि सीमा नाक्यांवर टोलच्या माध्यमातून होणारी बेकायदेशीर वसुली या मुद्द्यांवरून ‘सीजेपी’चे संस्थापक अभिजित दिपके यांनी राज्य सरकारविरोधात थेट आणि अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. नागपूर येथे बोलताना त्यांनी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी राज्यव्यापी आंदोलनाची मोठी घोषणा केली. अभिजित दिपके यांनी आपल्या भाषणात अधिकाऱ्यांच्या नियुक्तीवर आणि भ्रष्टाचारावर तीव्र आक्षेप घेतला. अभिजीत दिपके म्हणाले की, मुख्यमंत्री यांचे मित्र असलेले एमपीएससीचे अधिकारी वर आले आहेत. जर मुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे लोक अशा प्रकारे भ्रष्टाचार करत असतील, तर त्यात त्यांचाही काही हिस्सा आहे का? त्यांना आमदारांना गुवाहाटीला नेण्यासाठीही पैसे लागतात, असा तिखट प्रश्नही अभिजीत दिपके यांनी विचारला.

दोन मिनिटांचा व्हिडीओ बनवा आणि…

एमपीएससी अध्यक्ष विवेक भिमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी अभिजीत दिपके यांनी केली. भिमनवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मित्र आहेत, म्हणूनच त्यांचा राजीनामा घेतला जात नाही का? असा प्रश्न अभिजीत दिपके यांनी आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसमोर विचारला. इतकंच काय तर भिमनवार यांचा राजीनामा झालाच पाहिजे, या मागणीवर जोरही दिला. तसेच, भिमनवार यांच्या कथित घोटाळ्यांचा दोन मिनिटांचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.

…तर मतदान नाही

अभिजीत दिपके यांनी पुढे सांगितलं की, राज्यात तब्बल 15 ते 20 लाख एमपीएससीचे विद्यार्थी आहेत. आम्ही फडणवीस साहेबांना स्पष्ट सांगू इच्छितो की, आम्ही 20 लाख लोक आहोत, तुम्हाला आमचे मतदान नको आहे का? जर एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा मिळाला नाही, तर थेट ‘मतदान नाही’ हाच आमचा नारा असेल. हीच भाषा या सरकारला समजते, असंही अभिजीत दिपके पुढे म्हणाले.

गणपती बाप्पांचे विसर्जन झाले की लगेच आपण आंदोलनाला बसायचे

“जंतरमंतरवर जेव्हा आम्ही आंदोलनाला बसलो होतो, तेव्हा शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्यायला लावला होता. आता एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्यायचा असेल तर रस्त्यावर उतरावेच लागेल. हे सरकार सहजासहजी ऐकणार नाही,” असे सांगत दिपके यांनी आंदोलनाची पुढील रणनीती स्पष्ट केली. “गणपती बाप्पांचे विसर्जन झाले की लगेच आपण आंदोलनाला बसायचे, या मानसिकतेत तुम्ही या. आंदोलन विखुरलेले नसावे, ते एकाच ठिकाणी झाले पाहिजे. नागपूर, अमरावती किंवा संभाजीनगर यांपैकी एक ठिकाण राज्यभरातील विद्यार्थ्यांनी मिळून निश्चित करावे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Follow Us
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन