नागपुरात चार वर्षात 4 लाख वृक्षांची कत्तल, माहिती अधिकारात उघड

राज्य शासनातर्फे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीच्या मोहीम हाती घेतल्या जात (Tree cutting in Nagpur) आहेत. त्या माध्यामातून वृक्ष लागवडीसह त्याची जोपासनाही केली जाते.

  • सुनील ढगे, टीव्ही 9 मराठी, नागपूर
  • Published On - 23:26 PM, 17 Jan 2020
Baramati Tree cutting

नागपूर : राज्य शासनातर्फे मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीच्या मोहीम हाती घेतल्या जात (Tree cutting in Nagpur) आहेत. त्या माध्यामातून वृक्ष लागवडीसह त्याची जोपासनाही केली जाते. तर दुसरीकडे वृक्षांची तोडही मोठ्या प्रमाणात दिसून येते. एकट्या नागपूर विभागात 2015 पासून 2019 पर्यंत तब्बल चार लाख वृक्ष तोडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहिती अधिकारात ही माहिती समोर आली आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ही माहिती मागवली (Tree cutting in Nagpur) होती.

पर्यावरणाचं बिघडलेलं संतुलन साधण्याच्या दृष्टिकोनातून राज्य सरकारने वृक्ष लागवडीची मोहीम हातात घेतली आहे. गेल्या सरकारने 33 कोटी वृक्ष लागवड करण्याचं ठरवलं होतं. मात्र दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत असल्याचंही दिसून येत आहे.

2015 पासून 2019 पर्यंत नागपुरात 4 लाखांपेक्षा जास्त झाडांची कत्तल करण्यात आली. यात सागवनाच्या झाडांची संख्या मोठी आहेत. या झाडांची किंमत जवळपास 26 कोटींच्या घरात आहे. ही माहिती आरटीआयद्वारे उघड झाली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्ष तोड म्हणजे धोक्याची घंटा आहे. यात मोठं रॅकेट असण्याची शक्यता सुद्धा पर्यावरणवादी व्यक्त करतात. या झाडांची वृक्षतोड अनेक कारणांसाठी होत असली तरी त्या बदल्यात काय केलं जात हे सुद्धा महत्वाचं आहे. पर्यावरणवाद्यांच्या मते ही आकडेवारी कागदावर असली तरी त्यापेक्षा जास्त वृक्षतोड होत असल्याचं मतं झाल्याचे व्यक्त करत आहे.

एकीकडे वृक्ष लागवडीचा दिखावा, दुसरीकडे एकाच विभागात एवढी वृक्ष तोड होत असेल तर खरंच पर्यावरणाचा समतोल साधला जाईल का? असा प्रश्न उपस्थित होत (Tree cutting in Nagpur) आहे.