Sangli Ramdas Athawale : राज ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा नाही, सांगलीत रामदास आठवलेंची टीका; म्हणाले, त्यांचे काम भगव्याच्या विरोधात

राज ठाकरे विश्वभूषण भाजपा खासदार आहेत. राज ठाकरे यांना आयोध्यात येऊन देणार नाही, या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. राज ठाकरे कोणाचे न ऐकणारे नेते आहेत. भाजपाच्या नेत्यांचा त्यांना पाठिंबा नाही. जे आरोप केले जातात, ते चुकीचे आहेत, असे रामदास आठवले म्हणाले.

Sangli Ramdas Athawale : राज ठाकरेंना भाजपाचा पाठिंबा नाही, सांगलीत रामदास आठवलेंची टीका; म्हणाले, त्यांचे काम भगव्याच्या विरोधात
रामदास आठवलेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 08, 2022 | 2:48 PM

सांगली : राज ठाकरे यांनी शिवसेना (Shivsena) सोडली. त्यामुळे बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी धोका दिला आहे. त्यामुळे बाळासाहेबांचे नाव घेण्याचा त्यांना अधिकार नाही. अंगावर त्यांनी भगवी वस्त्र धारण केली हे चांगले आहे. पण राज ठाकरे यांनी शांततेची भूमिका मांडावी. त्यांनी पक्ष स्थापन करताना सर्व रंगांचे झेंडे आणले होते. पण आता भगवा रंग परिधान केला आहे. त्यांनी शांतता पसरावी पण भगव्या रंगाच्या विरोधात त्यांचे काम सुरू असल्याची टीका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केली. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, की काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाबरोबर मी होतो. पण त्यांचे चिन्ह घेऊन मी निवडणूक लढवली नाही. येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला मी आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (RPI) चिन्ह घेऊन निवडणूक लढवणार असल्याचे रामदास आठवले यांनी सांगितले.

‘जनतेला न्याय देण्यात महाविकास आघाडी अपयशी’

महाविकास आघाडीचे सरकार जनतेला न्याय देण्यात अपयशी ठरले आहे. या सरकारमध्ये नेते एकमेकांवर कुडघोड्या करण्याचे काम करत आहेत. तर या सरकारमध्ये काँग्रेस पक्ष्याला डावलले जात आहे. नाना पाटोले यांना विनंती करणार आहे. सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा आणि सरकार बनवण्याची आमची तयारी आहे. ब्राम्हण समाजाचा मुख्यमंत्री झाला पाहिजे याला माझा पाठिंबाही आहे. देवेंद्र फडणवीस हे सर्वांना सोबत घेऊन जातात. राज्याच्या विकासात त्यांनी भर पाडली असल्याचे आठवले म्हणाले.

‘भाजपावरचे आरोप चुकीचे’

राज ठाकरेंबद्दल बोलताना ते म्हणाले, की राज ठाकरे विश्वभूषण भाजपा खासदार आहेत. राज ठाकरे यांना आयोध्यात येऊन देणार नाही, या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे. राज ठाकरे कोणाचे न ऐकणारे नेते आहेत. भाजपाच्या नेत्यांचा त्यांना पाठिंबा नाही. जे आरोप केले जातात, ते चुकीचे आहेत. त्यांना वाटले हिंदुत्व मुद्दा घेतला तर त्यांना त्याचा फायदा होईल, मात्र असे होणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. तर बाबरी मशिदीच्या वादावर ते म्हणाले, की या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. एल्गार परिषदेमुळे दंगल झाली. पण या मताशी मी सहमत नाही. जी रॅली निघाली होती, त्या रॅलीला परवानगी द्यायला नको होती.

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.