AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या, हा शोध कुठून लावला?; संजय राऊत यांचा मोदींना सवाल

पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचे कौतुक केले, तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी यावर तीव्र टीका केली. राऊत यांनी संघाच्या स्वातंत्र्यलढ्यातील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या, हा शोध कुठून लावला?; संजय राऊत यांचा मोदींना सवाल
हा शोध कुठून लावला?; संजय राऊत यांचा मोदींना सवालImage Credit source: social media
| Updated on: Mar 31, 2025 | 12:23 PM
Share

देशाच्या स्वातंत्र्याच्या काळापासून संघ सेवेत कार्यरत आहे. गुलामीच्या शेवटच्या काळात तर संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि दुसरे संघचालक गोळवलकर गुरुजींनी देशाला ऊर्जा देण्याचं काम केलं आहे, असे उद्गार काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) काढले होते. गुढीपाडव्यानिमित्त नागपूरच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान मोदींनी माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या नवीन इमारतीची पायभरणी केली. त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव करताना हे विधान केंल. मात्र नरेंद्र मोदी यांच्या या विधानावर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं. संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. हा शोध त्यांनी कुठून लावला? असा थेट सवाल विचारत राऊत यांनी मोदींना टोला हाणला. लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचं जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत या देशाच्या जनतेची मानसिकता सुधारणार नाही, असं राऊतांनी सुनावलं.

स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठेच नव्हता

काल नागपूरमध्ये मोदींचं भााषण झालं. काय तर म्हणे संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. हा शोध त्यांनी कुठून लावला? संघाने गुलामीच्या बेड्या तोडल्या. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघ कुठेच नव्हता. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात संघाचं योगदान काय? असा सवाल राऊतांनी विचारला. एकदा त्यांनी आमच्याकडून ब्रिफिंग घेतलं पाहिजे. गुलामीच्या बेड्या तोडल्या म्हणजे संघाने काय केलं? दीडशे वर्ष हा देश गुलामीच्या बेड्यात जखडलेला होता. गांधी, पटेल, सरदार पटेल, सावरकर भगतसिंग यांच्या नेतृत्वात लढा झाला आणि गुलामीच्या बेड्या तुटल्या. मोदी म्हणतात तसा संघ यात कुठेच नव्हता. कधीच नव्हता. लोकांसमोर खोटा इतिहास ठेवण्याचं जोपर्यंत बंद होत नाही, तोपर्यंत या देशाच्या जनतेची मानसिकता सुधारणार नाही. तुम्ही लोकांना अंध भक्त करत आहात, भ्रमिष्ट करत आहात. वेडे करत आहात. हा देश एक दिवस जगात वेड्यांचा देश, खोटारड्यांचा देश म्हणून एखाद्या यादीत यायचा, अशी सडकून टीका राऊत यांनी यावेळी केली.

काय म्हणाले होते नरेंद्र मोदी ?

गुढीपाडव्या निमित्त नागपुरात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा गौरव केला. जिथे सेवा आहे, तिथे स्वयंसेवक आहे. स्वयंसेवकांना सेवा, संस्कार आणि साधना या मूल्यांमुळेच प्रेरणा मिळते, असे मोदी म्हणाले.

गुलामीच्या अखेरच्या काळात हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजींनी राष्ट्रीय चेतनेला नवीन ऊर्जा देण्याचं काम केलं. आज आपण पाहतोय, राष्ट्रीय चेतनेच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जे विचार बीज 100 वर्षापूर्वी पेरलं. ते महान वटवृक्ष बनून जगासमोर आहे. सिद्धांत आणि आदर्शाने या वटवृक्षाला उंची दिली आहे. कोट्यवधी स्वयंसेवक हे त्याच्या फांद्या आहेत. हा साधारण वटवृक्ष नाही. संघ भारताच्या अमर संस्कृतीचा आधुनिक अक्षय वट आहे. हा अक्षय वट आज भारताच्या संस्कृतीला आपल्या राष्ट्राच्या चेतनेला निरंतर ऊर्जावान बनवत आहे, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. गुलामीच्या शेवटच्या काळात तर संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार आणि दुसरे संघचालक गोळवलकर गुरुजींनी देशाला ऊर्जा देण्याचं काम केलं आहे, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

Follow Us
आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...
Ajit Doval Speech | आता अजित डोवाल यांचे तरुणांवर मोठे विधान, म्हणाले, तरुणांनी...
झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?
Uddhav Thackeray | झुरळ, भरकटलेले म्हणणारे पंतप्रधान मोदी तरुणांची माफी मागणार का?; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली...
Dhule Rain | 137 मिमी पावसानंतर पांजरा नदीला पूर; रातोरात रस्ते पाण्याखाली, प्रशासनाचा अलर्ट जारी
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना...
लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यात अमित शाहांचं मोठं वक्तव्य; तरुणांना दिलेल्या खास संदेशाची सर्वत्र चर्चा
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान;
अजित डोभाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान; अमित शाहांच्या हस्ते गौरव
सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी...
Raj Thackeray | सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमधून दरवर्षी 18 कोटींची चोरी, राज ठाकरेंच्या दाव्याने खळबळ; भरसभेत...
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा
ज्यांनी दिल्लीतून राजीनामा आणला त्यांना राज्यातून आणायला...' ठाकरेंचा निशाणा नेमका कुणावर?
आमदार फोडण्यासाठी पैसे, तरुणांसाठी नाहीत; ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
Raj Thackeray | आमदार फोडण्यासाठी पैसे आहेत, तरुणांसाठी नाहीत; राज ठाकरे सत्ताधाऱ्यांवर कडाडले
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान चर्चेत
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या व्हिडीओबाबत राज ठाकरेंचं विधान तुफान चर्चेत, म्हणाले 'तुम्ही म्हणाले ते मान्य मात्र...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत...
मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरचे फिंगरप्रिंट पाहायचेत; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंची फटकेबाजी