10th, 12th Exam : भावा अभ्यासच कर, कॉपी करणारे होणार फेल; विद्यार्थ्यांवर करडी नजर, CBSE च्या धरतीवर राज्य बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल

CCTV on Exam Centre : इयत्ता 10 आणि 12 वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठे पाऊल टाकलं आहे. CBSE परीक्षेच्या धरतीवर राज्यात आता परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. काय आहे अपडेट?

10th, 12th Exam : भावा अभ्यासच कर, कॉपी करणारे होणार फेल; विद्यार्थ्यांवर करडी नजर, CBSE च्या धरतीवर राज्य बोर्डाच्या परीक्षेत मोठा बदल
राज्य मंडळाचा मोठा निर्णय
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 11:32 AM

आता इयत्ता 10 आणि 12 वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठे पाऊल टाकलं आहे. CBSE परीक्षेच्या धरतीवर राज्यात आता परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या या धोरणामुळे परीक्षा केंद्रावरील सर्वच गैरप्रकारांना आळा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिवाळीनंतर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा केंद्राच्या झाडाझडतीला ही सुरुवात होणार आहे. विद्यार्थी सुरक्षा आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

आता परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत अनेक वेळा सीसीटीव्ही बसवा आणि त्याचे स्टोरेज करण्याची चांगली क्षमता असावी अशा सूचना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना वारंवार देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर आता सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. त्यामुळे कॉपी करणारे विद्यार्थी, त्यांना मदत करणारे नातेवाईक आणि काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्हीचा जालीम उपाय करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

तर परीक्षा केंद्रच रद्द

मात्र, आजही अनेक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आले नाही. त्यामुळे ही परिस्थिती पाहता आता सीबीएसई बोर्डाच्या धरतीवर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहे. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नसतील, त्यांचे परीक्षा केंद्रच रद्द होणार आहे. परीक्षा केंद्र कायम ठेवायचे असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसोबतच परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. या दिवाळीनंतर परीक्षा केंद्राच्या झाडाझडतीला सुरुवात होणार आहे.

पासिंग सेंटरचे पानिपत होणार?

राज्यात इयत्ता 10 आणि 12 वीची अनेक पासिंग सेंटर उदयाला आली आहेत. ग्रामीण भागात ही परीक्षा केंद्र फुलली आहेत. या अडवळणाच्या केंद्रावर राज्यातील अनेक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी खास येतात. साधी रिक्षा सुद्धा न येणाऱ्या या गावांमध्ये परीक्षेच्या काळात लाखोच्या कार उभ्या असतात. या ठिकाणी विद्यार्थ्यांना पासिंगसाठी खास व्यवस्था करण्यात आलेली असते. आता अशा परीक्षा केंद्रावर सीसीटीव्हीची खरंच निगराणी असेल का? या तिसऱ्या डोळ्यामुळे अशा पासिंग सेंटरच्या गोरखधंद्याला आळा बसेल का? असा प्रश्न पालक आणि विद्यार्थी वर्गातून विचारण्यात येत आहे.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....