AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार गटातील अर्ध्या लोकांचा महायुतीला विरोध…; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

Ambadas Danve on NCP Ajit Pawar Group : राष्ट्रवादी अजित पवार गटाबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी अजित पवार गटाबाबत मोठा दावा केला आहे. महायुतीच्या जागावाटपाबाबतही दानवे यांनी महत्वाचं विधान केलं आहे. वाचा सविस्तर...

अजित पवार गटातील अर्ध्या लोकांचा महायुतीला विरोध...; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
अंबादास दानवे
| Updated on: Jun 23, 2024 | 5:21 PM
Share

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जागावाटपाच्या मुद्द्यावर भाष्य केलंय. महायुतीच्या जागा वाटपावर बोलताना अंबादास दानवे यांनी मोठा दावा केला आहे. माझ्या माहितीप्रमाणे आज अजित पवार गटाची बैठक झाली आहे. अजित पवार गटातील अर्ध्या लोकांनी महायुती करायला विरोध केला आहे. त्यामुळे महायुतीचं जागावाटप झालं. या कपोल कल्पित तुमच्या बातम्या आहेत. अजून कोणत्याच पक्षाचे काहीही सुरू झालेले नाही. त्यामुळे मला असं वाटतं, अजून कोणत्याच पक्षाचे जागावाटप झालेलं नाही, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

निवडणूक आयोगाने जो अहवाल मागवला आहे. ते त्याच वेळेस केले असते. तर चांगलं झालं असतं. पण तरी काही हरकत नाही ‘देर आहे दुरुस्त आये’ येणाऱ्या विधानसभेत असे काही होऊ नये याची खबरदारी निवडणूक आयोगाने घ्यावी, असंही अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.

छगन भुजबळांना काय आवाहन?

दुश्मन कोण आहे हे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले असतं. मराठा त्यांचे दुश्मन आहेत का…? हे स्पष्ट केलं असतं. तर बरं झालं असतं. तर ‘दिलबर के लिए दिलदार है हम, दुश्मन के लिए तलवार है हम’ तर तुमचे दुश्मन कोण आहे ही भूमिका छगन भुजबळ साहेबांनी स्पष्ट करावी, असं आव्हानही अंबादास दानवे यांनी छगन भुजबळांना दिलं आहे.

आरक्षणावर काय म्हणाले?

मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणापाठोपाठ मुस्लिम आरक्षणाचा मुद्दाही चर्चेत आला आहे. यावरही अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरक्षण हे जातीसाठी असतं. ते धर्मासाठी नसतं. मुसलमानाची एखादी जात कुणबी असेल. मुसलमानात कुणबी आहेत. मुसलमानातील जातीला आरक्षण आहे. परंतु धर्माला नाही. त्यामुळे एखाद्या धर्मामध्ये अशी जात असेल तर त्यांना कुणबी आरक्षण मिळतं. मुस्लिमांना आरक्षण मुद्दा येत नाही परंतु मुस्लिमातील जातींना आरक्षण आहे, असं अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.