मोठी बातमी! पंजात ‘कमळाचं’ फुल; काँग्रेस नगरसेवकांचं भाजपला मत, उपनगराध्यक्ष दिला निवडून

Congress BJP Alliance: युती, आघाडी होतील. पण काँग्रेससोबत कधीच जाणार नाही असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. पण या नगरपरिषदेत उपनगराध्यक्ष पदासाठी भाजपने चक्क काँग्रेसशी हातमिळवणी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे राजकारणात कोणीच कुणाचा शत्रू अथवा मित्र नसतो हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या नव्या युतीमुळे एकच खळबळ उडाली आहे.

मोठी बातमी! पंजात कमळाचं फुल; काँग्रेस नगरसेवकांचं भाजपला मत, उपनगराध्यक्ष दिला निवडून
काँग्रेस-भाजपच्या युतीने खळबळ
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Edited By: | Updated on: Jan 18, 2026 | 2:09 PM

Congress BJP Alliance in Khultabad Nagar Parishad: राजकारणात कोणीच कुणाचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो. पण देशात कुठंच अद्याप काँग्रेस आणि भाजपची हातमिळवणी झाल्याचे ऐकवत नाही अथवा समोर आलेले नाही. कारण दोनही पक्ष एकमेकांचं वैचारिक विरोधक आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपसोबत वैचारिक लढाई असल्याचे ठामपणे सांगितले. पण त्यांच्याच पक्षातील चार नगरसेवकांनी सत्तेसाठी भाजपशी हातमिळवणी केल्याचे समोर आले आहे. या नवीन युतीमुळे एकच खळबळ उडाली आहे. आतापर्यंत सर्वच प्रकारच्या आघाड्या, युती झाली आहे. पण काँग्रेस आणि भाजप एकत्र आले नव्हते. खुलताबाद नगर परिषद मात्र त्याला अपवाद ठरली आहे.

काँग्रेसच्या नगरसेवकांचे भाजपला मतदान

Live

Municipal Election 2026

09:12 PM

आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले

07:54 PM

उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश  

07:36 PM

नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार

07:31 PM

भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

छत्रपती संभाजीनगरमधील खुलताबाद नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसच्या नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला मतदान केले. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. ही कोणती युती, कोणती आघाडी असा सवाल करण्यात येत आहे. काँग्रेसने आपल्या चार नगरसेवकावर निलंबनाची कारवाई प्रस्तावित केली आहे. शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे अधिकृत भूमिकेला विरोध करत चार नगरसेवकांनी भाजपचे उमेदवार नवनाथ बारगळ यांना मतदान केले होते. या नवीन समीकरणाची आता राज्यभर चर्चा होत आहे. यावरून आता वाद वाढला आहे.

काँग्रेसच्या मतदानामुळे भाजपचा उपनगराध्यक्ष

दरम्यान काँग्रेसच्या चार नगरसेवकांनी मतदान केल्यामुळे भाजपाचे नवनाथ बारगळ विजयी झाले. या प्रकरणी काँग्रेस तालुका अध्यक्षांनी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष यांच्याकडे प्रस्ताव पाठवला, आणि हा प्रस्ताव काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडे सादर करण्यात आला आहे. याच प्रकरणी आता काँग्रेसच्या चार नगरसेवकावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. पण भाजपकडून अजून याप्रकरणी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही.

खुलताबादमध्ये नगराध्यक्ष पद काँग्रेसकडे

खुलताबाद नगराध्यक्ष पद काँग्रेसच्या अमिर पटेल यांना मिळालं आहे. खुलताबाद नगरपरिषदेत काँग्रेसच्या चार जागा निवडून आल्या आहेत्. भाजपचे 7 उमेदवार विजयी ठरले. तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 9 उमेदवार निवडून आले आहेत. यापूर्वी 2017 मध्ये या नगरपरिषदेवर काँग्रेसचेचे एस एम कमर विजयी नेते ठरले होते. या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व असताना काँग्रेसने इथे आघाडी घेतल्याने त्याची चर्चा रंगली होती.