AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar: बड्या कंपन्यांची आपल्याकडं गुंतवणूक का नाही? फडणवीस दावोस दौऱ्यावर असतानाच रोहित पवारांचा खोचक टोला

Rohit Pawar Remark on Investment: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकाऱ्यांसोबत दावोस दौऱ्यावर आहेत. पाच दिवस ते दावोस दौऱ्यावर असतील. पण त्यापूर्वी रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून अचूक निशाणा साधला आहे. त्यांनी सध्याच्या औद्योगिक घडामोडींवरुन खोचक टोला हाणला आहे.

Rohit Pawar: बड्या कंपन्यांची आपल्याकडं गुंतवणूक का नाही? फडणवीस दावोस दौऱ्यावर असतानाच रोहित पवारांचा खोचक टोला
रोहित पवारांचा खोचक टोलाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jan 18, 2026 | 12:09 PM
Share

Rohit Pawar on Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उद्योगमंत्री उदय सामंत आणि अधिकारी असा लवाजमा घेऊन दावोसला जात आहे. महाराष्ट्रात गुंतवणूक वाढवण्यासाठी आणि जगभरातील कंपन्यांना महाराष्ट्राकडे वळवण्यासाठी त्यांचा हा दौरा महत्त्वाचा मानल्या जात आहे. गेल्यावेळी ते दावोसला गेल्यावर मोठी गुंतवणूक आणि अनेक कंपन्या राज्यात येणार असल्याचा दावा करण्यात आला होता. पण रोहित पवार यांनी आता त्यावरूनच मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वी ट्विटमधून खोचक टोला लगावला आहे. त्यांनी जागतिक दर्जाच्या कोणत्या कंपन्या इतर राज्यात गेल्या याची माहिती दिली आहे.

रोहित पवारांनी यादीच दाखवली

Live

Municipal Election 2026

09:12 PM

आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही - अमेय घोले

07:54 PM

उल्हासनगरमध्ये अपक्ष विजयी उमेदवार सविता तोरणे यांचा शिवसेनेत प्रवेश  

07:36 PM

नवा महापौर निवडीपर्यंत शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक हॉटेलमध्येच राहणार

07:31 PM

भाई जगताप यांना काँग्रेसची कारणे दाखवा नोटीस

07:48 PM

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, आकडे बहुतमापेक्षाही अधिक

07:18 PM

सोलापूरच्या निवडणुकीत पैशाचा आणि सत्तेचा गैरवापर करून भाजपचा विजय : अमोल बापू शिंदे यांची टीका

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी कोणत्या कंपन्या या इतर राज्यात गेल्या याची माहिती ट्विटमधून दिली आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटल्यानुसार, Disney ही मनोरंजन क्षेत्रातील तर Honeywell ही सायबर सिक्युरिटी तंत्रज्ञानांतील आघाडीची कंपनी आहे. या दोन्ही कंपन्यांनी भारतात विस्तार करण्यासाठी बंगळुरु मधील बेलंदुर ची निवड केलीय. Disney ने बेलंदुर इथे 1,74,000 Sqft जागा भाड्याने घेण्याचा करार केलाय तर honeywell ने तब्बल 4,00,000 Sqft चं ऑफिस सात वर्षांसाठी घेतलंय. बाहेरील कंपन्या या इतर राज्यात गुंतवणूक करत आहेत अशा आशयाचे ट्विट त्यांनी केलं आहे.

मग आपल्याकडं गुंतवणूक का नाही?

तर यावेळी सरकार दावोसमध्ये जाते मग आपल्याकडं मोठ्या कंपन्या का येत नाही याविषयीचे सूतोवाच केले.Deloitte ने देखील मंगलुरु मध्ये येऊन तब्बल 50,000 लोकांची भरती करणार असल्याची घोषणा केली आहे. maruti suzuki तब्बल 35000 कोटी गुंतवणूक करून गुजरातमध्ये नवा प्लांट उभारत आहे. मुंबई पर्यायाने महाराष्ट्र देशाचे आर्थिक इंजिन असताना व राज्यात बेरोजगारी वाढत असताना या कंपन्या आपल्याकडं ही गुंतवणूक का करत नाहीत, असा एक नागरिक म्हणून प्रश्न पडतो, असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

आजपासून मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोस दौऱ्यावर जात आहेत. या दोघांनी शर्थीचे प्रयत्न करून जागतिक दर्जाच्या अशा नामांकित कंपन्यातून राज्यात जास्ती जास्त गुंतवणूक आणून राज्यातील बेरोजगार युवकांना दिलासा द्यावा अशी अपेक्षाही त्यांनी या ट्विटमधून व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री 5 दिवसीय दाओस दौऱ्यावर

उद्यापासून देवेंद्र फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर आहेत. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीला ते उपस्थित असतील. मुख्यमंत्री 19 ते 23 जानेवारीपर्यंत दावोसमध्ये असतील. गेल्यावर्षी राज्य सरकारने जवळपास 16 लाख कोटींहून अधिकचे करार केले होते. यंदाही तितकेच करार करण्याचे सरकारचे लक्ष आहे. तर गेल्यावेळी केलेल्या करारातील 72 टक्के MoU प्रत्यक्षात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; 'या' स्थानकांवर थांबणार नाही लोकल
मध्य रेल्वेवर मेगा ब्लॉक; 'या' स्थानकांवर थांबणार नाही लोकल.
मुंबईत भाजप, महायुती सत्ता आली; पण ठाकरेंनी ठसा उमटवला
मुंबईत भाजप, महायुती सत्ता आली; पण ठाकरेंनी ठसा उमटवला.
प्रचारातही धुरंधर... आणि निकालातही फडणवीस 'धुरंधर'
प्रचारातही धुरंधर... आणि निकालातही फडणवीस 'धुरंधर'.
56 फुटले, ठाकरेंनी 66 निवडून आणले! मुंबई महापालिकेत कोण सरस?
56 फुटले, ठाकरेंनी 66 निवडून आणले! मुंबई महापालिकेत कोण सरस?.
दोन्ही पवारांच्या वर्चस्वाला मोठे हादरे! साखर वाटूनही बिघडलं घड्याळ
दोन्ही पवारांच्या वर्चस्वाला मोठे हादरे! साखर वाटूनही बिघडलं घड्याळ.
राज ठाकरेंच्या मेहनतीवर उबाठाने पाणी फेरलं! उदय सामंतांचा टोला
राज ठाकरेंच्या मेहनतीवर उबाठाने पाणी फेरलं! उदय सामंतांचा टोला.
गिरे तो भी टांग उपर! उदय सामंतांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका
गिरे तो भी टांग उपर! उदय सामंतांची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका.
देवाची इच्छा असेल तर आपला...; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना
देवाची इच्छा असेल तर आपला...; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या भावना.
काही नासके लोक सोबत ठेवल्याने...; मनोज जरांगेंची अजित पवारांवर टीका
काही नासके लोक सोबत ठेवल्याने...; मनोज जरांगेंची अजित पवारांवर टीका.
अंबरनाथ पालिकेची सभा तहकूब करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
अंबरनाथ पालिकेची सभा तहकूब करण्याचे हायकोर्टाचे निर्देश.