AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

tv9 Marathi Co-Operative Summit : दुग्ध व्यवसायाला ‘अच्छे दिन’ येणार, डेअरीचे प्रश्न सुटणार, अतुल सावेंचं आश्वासन

दुग्ध व्यवसाय अडचणीत आहे. काही सहकारी संस्था अडचणीत आहेत. ज्या अडचणीत आहेत त्यांना कशी मदत करता येईल? यासाठी प्रयत्न करणार आहोत. डेअरीचे प्रश्न सोडण्यात येणार आहेत असं मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे.

tv9 Marathi Co-Operative Summit : दुग्ध व्यवसायाला 'अच्छे दिन' येणार, डेअरीचे प्रश्न सुटणार, अतुल सावेंचं आश्वासन
| Updated on: Mar 01, 2025 | 6:04 PM
Share

दुग्ध व्यवसाय अडचणीत आहे. काही सहकारी संस्था अडचणीत आहेत. ज्या अडचणीत आहेत त्यांना कशी मदत करता येईल? यासाठी प्रयत्न करणार आहोत. डेअरीचे प्रश्न सोडण्यात येणार आहेत असं मंत्री अतुल सावे यांनी म्हटलं आहे. ते महाराष्ट्राचा महासंकल्प, सहकारातून समृद्धीकडे या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

नेमकं काय म्हणाले अतुल सावे? 

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष जाहीर केलं आहे.  समाजातील अनेक लोकांना, आर्थिक दुर्बल गटातील लोकांना सबल करण्यासाठी सहकार क्षेत्र हे उत्तम क्षेत्र आहे. त्यामुळे मोदी सरकारने सहकार मंत्रालयाची स्थापना केली.  गेल्या ७० वर्षात कोणत्याही सरकारने यबाबत विचार केला नव्हाता. मोदी सरकारच्या विशेष प्रयत्नामुळे देशभरात आता सहकार क्षेत्राला पुन्हा एकाद चांगले दिवस येण्यास सुरुवात झाली आहे, असं अतुल सावे यांनी म्हटलं आहे.

ते पुढे बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रात १२ हजार विविध कार्यकारी सहकारी संस्था आहेत. अमित शाह यांनी सहकार खात्याचा पदभार घेतल्यावर त्यात पारदर्शकता आणण्यासाठी पाऊल उचलले. सर्व संस्था संगणीकृत केल्या. त्यासाठी ५०० कोटींचा निधी दिला. सर्व संस्था कॉम्प्युटरराईज्ड झाल्यावर त्यावर नियंत्रण ठेवणे आता सोपे झाले आहे. गैरव्यवहार रोखता येतात. फक्त शेतीवर शेतकरी राहू शकत नाही. त्यामुळे जोडधंदे या कोऑपरेटिव्ह सोसायटीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुग्ध व्यवसाय अडचणीत आहे. काही सहकारी संस्था अडचणीत आहेत. काही चांगल्या आहेत. ज्या अडचणीत आहेत त्यांना कशी मदत करता येईल याचा प्रयत्न करणार आहोत. डेअरीचे प्रश्न सोडण्यात येणार आहेत. दुधाचं उत्पन्न वाढलं पाहिजे, यासाठी आमचा प्रयत्न असेल. मुंबईच्या आसपासच्या भागातील दूध उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आरेच्या गोठ्यांनाही भेटी दिल्या आहेत.

शिक्षण झालं म्हणजे प्रत्येकाला वाटतं नोकरी करावी. शेती करायची नाही. त्यामुळे शेतीकडे दुर्लक्ष होत आहे. दुग्ध व्यवसाय हा लक्षपूर्वक करण्याचा व्यवसाय आहे. शेतीला जोडधंदा केला तर अनेक चांगले व्यवसाय होऊ शकतात. त्यामुळे येणाऱ्या पिढीला ज्ञान मिळू शकते, असं अतुल सावे यांनी म्हटलं आहे.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.