“भाजपला आंदोलन करण्याची गरज काय? माझ्या हातात…” आदित्य ठाकरेंचा थेट सवाल, म्हणाले “हा राजकीय विषय…”
आज आमच्या हातात काय आहे. भाजपला आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का? सरकार आहे का?" असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला.
Aaditya Thackeray On Sambhaji nagar Fight : आगामी विधानसभा निवडणुकांच्या सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर आमदार आदित्य ठाकरे यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याला भाजपकडून विरोध करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरममधील रामा हॉटेलबाहेर भाजप आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्ते आमने-सामने आले. आता या घटनेवर शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपला आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का? सरकार आहे का? असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना विरुद्ध भाजप मोठा राडा झाला. यानंतर आदित्य ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपने केलेल्या आंदोलनावर भाष्य केले. “आम्ही केलेलं आंदोलन हे योग्यरित्या केलं होतं. हे सर्वजण पोलिसांना समोर ठेवतात आणि आंदोलन करतात. हे सर्वजण भित्रे आहेत. आम्ही केलेलं आंदोलन हे पंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी केलं होतं. आज आमच्या हातात काय आहे. भाजपला आंदोलन करण्याची गरज होती का? माझ्या हातात पद आहे का? सरकार आहे का?” असा प्रश्न आदित्य ठाकरेंनी विचारला.
यावेळी आदित्य ठाकरेंनी दिशा सालियानचे फोटो दाखवण्याबद्दल विचारणा करण्यात आली. यावर आदित्य ठाकरेंनी “हा संपूर्ण विषय राजकीय आहे. ते सर्व चालूच राहील. ज्यांना ते घाबरतात, त्यांची बदनामी केली जाते. त्यांना धमकावले जाते. गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक राज्यात हे केले जात आहे”, असे म्हटले.
बदलापुरात झालेला लाठीचार्ज कोणाच्या आदेशाने झाला?
“बदलापुरातील घटना अतिशय संतापजनक आहे. आज झालेल्या आंदोलनात शिवसैनिकांवर जो लाठीचार्ज करण्यात आला, त्यासाठी मी पोलिसांना दोष देत नाही. कारण सरकार त्यांच्या हातात आहे. पोलिसांना आदेश दिले जातात, जरांगे पाटील यांच्यावर जो लाठीचार्ज झाला, तो कोणाच्या आदेशाने झाला होता. तुम्ही पोलिसांवर कारवाई केली असेल, पण वारकऱ्यांवर पोलिसांनी केलेली कारवाई, बदलापुरात झालेला लाठीचार्ज हे सर्व कोणाच्या आदेशाने झालं होतं, याचीही माहिती समोर यायला हवी”, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.
“ही निवडणूक आहे. लढाई नाही”
“आम्ही केलेलं आंदोलन हे योग्यरित्या केलं होतं. हे सर्वजण पोलिसांना समोर ठेवतात आणि आंदोलन करतात. हे सर्वजण भित्रे आहेत. आम्ही केलेलं आंदोलन हे पंतप्रधानांना जाब विचारण्यासाठी केलं होतं. आज आमच्या हातात काय आहे, आमच्या हातात सत्ता द्या, मग आम्ही कायदा कसा असतो ते दाखवतो. ही निवडणूक आहे. लढाई नाही, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवून वागावं”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.