AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“दूध का दूध और पानी का पानी”, वाघ्या कुत्र्याबाबत छत्रपती संभाजीराजे यांची नवी मागणी

लोकशाही ढाचा शिवाजी महाराजांनी रचला. महाराजांच्या रूपाने देव पाहायला मिळाला. महाराज युगपुरुष होते. त्यांची काही जणांकडून अवहेलना केली जाते. त्यामुळे यासंदर्भात कायदा केला पाहिजे. कायदा बनवायला बजेटची गरज नसते. आता हा कायदा करुन फास्ट ट्रॅक कोर्ट माध्यमातून ट्रायल झाली पाहिजे.

दूध का दूध और पानी का पानी, वाघ्या कुत्र्याबाबत छत्रपती संभाजीराजे यांची नवी मागणी
वाघ्या कुत्र्याबाबत संभाजीराजे यांची मागणीImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Mar 29, 2025 | 11:26 AM
Share

Waghya Statue Controversy: गेल्या काही दिवसांपासून रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या स्मारकावरुन वाद निर्माण झाला आहे. छत्रपती घराण्याचे वंशज संभाजीराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या विषयाला वाचा फोडली. त्यात त्यांनी वाघ्या कुत्र्याचे स्मारक रायगडावरून हटवण्यात यावे, अशी मागणी केली. त्यानंतर त्यांच्या मागणीला विरोध करणारा गटही समोर आला. या विषयावर सत्य समोर आणण्यासाठी इतिहासकारांची समिती बसवा, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली.

वाघ्या कुत्र्याबाबत काय म्हणाले…

संभाजी राजे वाघ्या कुत्र्याबाबत बोलताना म्हणाले, वाघ्या, वाघ्या कोण वाघ्या? देशात एकच वाघ होऊन गेला छत्रपती शिवाजी महाराज. इतिहासात कुठेही वाघ्या कुत्र्याची नोंद नाही. तर सत्य शोधण्यासाठी इतिहासकारांची समिती बसवा. त्या वाघ्या कुत्र्याबाबत धनगर समाज, होळकर यांचा संबंध काय? असा प्रश्न त्यांनी विचारला.

महापुरुषांची विटंबना कायदा का केला नाही?

महापुरुषांची विटंबना करणाऱ्याविरोधात कडक कायदा या अधिवेशनात का केला नाही? असा प्रश्न उदयनराजे यांनी विचारला. हा कायदा आता एक विशेष अधिवेशन बोलवून पारीत करा. महापुरुषांविरोधात वक्तव्य करणारा हा कायदा अजामीनपात्र करा. याबाबत अधिवेशन बोलवले नाही तर त्याचा अर्थ असा होईल की यांना शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा अवमान मान्य आहे. हा कायदा तुम्ही पारीत केला तर राहुल सोलापूरकर, कोरटकर यासारखी लोक धाडस करणार नाही. या कायद्यात महापुरुषांची विटंबना करणाऱ्यांना 10 वर्षांची शिक्षा करण्याची तरतूद केली पाहिजे.

उदयनराजे भोसले म्हणाले, लोकशाही ढाचा शिवाजी महाराजांनी रचला. महाराजांच्या रूपाने देव पाहायला मिळाला. महाराज युगपुरुष होते. त्यांची काही जणांकडून अवहेलना केली जाते. त्यामुळे यासंदर्भात कायदा केला पाहिजे. कायदा बनवायला बजेटची गरज नसते. आता हा कायदा करुन फास्ट ट्रॅक कोर्ट माध्यमातून ट्रायल झाली पाहिजे.

अरबी समुद्रात शिवाजी महाराज स्मारकाची घोषणा करण्यात आली होती. त्याचे भूमीपूजनही झाले. त्या समारंभास मी होतो. परंतु शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी साधा १ रुपयासुद्धा दिला नाही. मुंबईसारख्या ठिकाणी महाराजांचे स्मारक झालेच पाहिजे, असे उदयनराजे भोसले यांनी म्हटले.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.