फोटो काढण्यापेक्षा काम केलं असतं तर लसीकरण थांबलं नसतं; संजय निरुपम यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी लसीकरणाच्या कार्यक्रमात फोटो काढत बसण्यापेक्षा लसीकरणाच्या तांत्रिक बिघाडात दुरुस्ती केली असती तर लसीकरण थांबले नसते अशी खरमरीत टीका केली आहे. (Sanjay Nirupam Uddhav Thackray)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 14:44 PM, 17 Jan 2021
फोटो काढण्यापेक्षा काम केलं असतं तर लसीकरण थांबलं नसतं;  संजय निरुपम यांचा महाविकास आघाडीला घरचा आहेर

मुंबई : कोरोनाला थोपवण्यासाठी संपूर्ण देशात 16 जानेवारीपासून लसीकरण सुरु झाले असले तरी तांत्रिक बिघाडामुळे राज्यात 2 दिवस कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम थांबवण्यात आली आहे. या मोहिमेसाठी वापरण्यात येणाऱ्या कोविन नावाच्या ॲपमध्ये तांत्रिक समस्या आल्याने कोरोना लसीकरणाची मोहीम थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यांनतर आता राज्यात सत्तेत असलेल्या घटपक्षाचे म्हणजेच काँग्रेसचे नेते संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांनी राज्यसरकारला घरचा आहेर दिला आहे. उद्धाटन कार्यक्रमात फोटो काढत बसण्यापेक्षा लसीकरणाच्या तांत्रिक बिघाडात दुरुस्ती केली असती तर लसीकरण थांबले नसते अशी खरमरीत टीका काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली आहे. (Sanjay Nirupam criticizes maharashtra government and Uddhav Thackray on photo session during corona vaccination compagion inauguration)

शनिवारी राज्यात ठिकठिकाणी लसीकरणाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठकरे ( Uddhav Thackray) आणि महाविकास आघाडीचे मंत्री उपस्थित होते. यावेळी माध्यम प्रतिनिधी आणि इतर जनतेने या नेत्यांचे फोटो काढले. याच मुद्द्यावर संजय राऊत यांनी वरील टीका केली.

“महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण थांबवण्यात आले आहे. यामागे काही तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगितले जात आहे. काल लसीकरणाचे उद्धाटन करताना फोटो काढण्यासाठी एकमेकांमध्ये स्पर्धा लागली होती. राज्यात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. मात्र, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी स्वत:चा फोटो काढून घेतले,” असं संजय निरुपम यांनी म्हटलंय. तसेच, फोटोशूट करण्यापेक्षा लसीकरणाची प्रोसेस आणि झालेली तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याकडे लक्ष दिलं असतं तर चांगलं झालं असतं. दोन दिवसांसाठी लसीकरणाचा कार्यक्रम थांबला नसता असा खोचक टोलाही काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी लगावला आहे.

मुंख्यंमत्र्यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा कार्यक्रम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत काल (16 जानेवारी) बीकेसीत (BKC) लसीकरणाच्या कार्यक्रमास प्रारंभ झाला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर तसेच इतर मान्यवर या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी बोलताना, “लस आली म्हणजे मास्क घालणं सोडायचं नाहीये. लस घेतल्यानंतरही तुम्हाला मास्क घालणं बंधनकारक असणार आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं. तसेच “कोरोनाचा शेवट करायचा आहे. जोपर्यंत कोरोना संपत नाही, तो पर्यंत सरकारकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनाचं पालन करा”, असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी जनतेला केलं.

सोमवारपर्यंत लसीकरण बंद

दरम्यान, कोरोना (कोविड 19) लसीकरण मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर कोविन नावाच्या ॲपमध्ये तांत्रिक समस्या आल्या होत्या. या कारणामुळे कोरोना लसीकरणाची मोहीम बंद करण्यात आली होती. हा तांत्रिक दोष दूर करण्याचे काम सुरु असून आज आणि उद्या (18 जानेवारी) या दोन दिवशी राज्यात लसीकरण बंद असेल.

लसीकरण करत असताना संपूर्णपणे डिजिटल नोंदणी करणे सक्तीचे आहे. मात्र, कोवीन या अ‌ॅपमध्ये अचानक बिघाड झाल्यामुळे लसीकरण स्थगित ठेवण्यात आले आहे. कोविन ॲप पूर्ववत होताच लसीकरण पुन्हा सुरू होणार आहे. याच कारणामुळे काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी राज्यातील ठाकरे सरकारला घेरलं.

संबंधित बातम्या :

मोठी बातमी : कोविन ॲपमधील तांत्रिक दोषामुळे कोरोना लसीकरण 2 दिवस बंद

Cm Uddhav Thackeray Corona Vaccination | सर्वात उत्तम लस म्हणजे तोंडावरील मास्क : मुख्यमंत्री

Photo : कोविड योद्धांना लस टोचली; राज्यात लसीकरण सुरू

(Sanjay Nirupam criticizes maharashtra government and Uddhav Thackray on photo session during corona vaccination compagion inauguration)