Photo : कोविड योद्धांना लस टोचली; राज्यात लसीकरण सुरू

आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. (Covid warriors vaccinated; Vaccination continues in the state)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:34 PM, 16 Jan 2021
1/5
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून देशवासियांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे.
2/5
मुंबईतील बीकेसी लसीकरण केंद्रावर मुख्यमंत्र्यांसह पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थानिक काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी उपस्थित होते.
3/5
आहारतज्ज्ञ डॉ. मधुरा पाटील यांना मुंबईत पहिली लस देण्यात आली. तर डॉ मनोज पासांगे यांना दुसरी लस मिळाली.
4/5
सांगलीतील इस्लामपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार धैर्यशील माने, जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांच्या हस्ते लसीकरणास सुरुवात.
5/5
कुणाला किती लस द्यायची याचा निर्णय केंद्राचा आरोग्य विभाग घेतो. त्यामुळे कोणत्या राज्याला किती लस दिल्या यात राजकारण करू नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.