AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रूरकर्मा कसाबची कोठडी बनवण्यात शरद पवारांच्या ‘या’ खास माणसाचं डोकं! नेमक काय होतं विशेष?

संजय राऊत यांनी त्यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केलेले आहेत. याच पुस्तकात त्यांनी अजमल कसाबच्या कोठडीविषयी माहिती दिली आहे.

क्रूरकर्मा कसाबची कोठडी बनवण्यात शरद पवारांच्या 'या' खास माणसाचं डोकं! नेमक काय होतं विशेष?
ajmal kasab barracks
| Updated on: May 24, 2025 | 5:45 PM
Share

Sanjay Raut Book : अजमल कसाब नावाचा क्रुरकर्मा आज हयात नाही. भारताने त्याला फासावर लवटकवलं. मुंबईवर 26/11 ला झालेल्या हल्ल्यात याच कसाबसह इतरांचा सहभाग होता. कसाबला जिवंत पकडून आर्थर रोड तुरुंगात त्याला यमसदनी पाठवण्यात आलं. दरम्यान, कसाबला आर्थर रोड तुरुंगात ठेवण्यासाठी खास तयारी करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्या तरुंगांची सुरक्षा व्यवस्था तसेच कसाबच्या कोठडीची रचानाही आगळ्या-वेगळ्या पद्धतीने करण्यात आली होती. विशेष म्हणजे कसाबच्या कोठडीचे डिझाईनच खासदार शरद पवार यांच्या एका खास माणसाने केले होते.

कसाबची कोठडी कोणी बांधली?

अजमल कसाबच्या या खास कोठडीबाबत खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तकात सविस्तर लिहिण्यात आलंय. याच पुस्तकात कसाबच्या कोठडीचे डिझाईन नेमके कोणी केली, याची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कोठडी ज्या व्यक्तीने बांधली ती व्यक्ती शरद पवार यांच्या जवळची आणि विश्वासू मानली जाते. ही व्यक्ती दुसरी-तिसरी कोणी नसून माजी मंत्री जयंत पाटील हे आहेत.

संजय राऊतांच्या पुस्तकात नेमकं काय आहे?

संजय राऊत यांनी आपल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकात आर्थ रोड तुरुंगात असतानाचे अनुभव सांगितले आहेत. याच पुस्तकात त्यांनी कसाब आणि कसाबची कोठडी याविषयी माहिती दिली आहे. “मी 12 नंबरच्या यार्डात होतो. आर्थर रोड जेलच्या सगळ्यांत शेवटी हे या र्ड आहे. या यार्डात शिरण्यासाठी तीन स्वतंत्र दरावाजे आहेत. चाही बाजूंनी बुलेटप्रुफ आणि बॉम्बप्रुफ भिंती तसेच लोखंडी कवच आहे. हे का? कारण कसाब याच यार्डात होता. कसाबचे वास्तव्य असलेल्या यार्डातच मला आणि अनिल देशमुख यांना ठेवण्यात आले होते. यथे बाहेरचा संपर्क नाही. सूर्यकिरणांची तिरीप नाही,” अशी आठवण राऊत यांनी आपल्या पुस्तकात सांगितलेली आहे.

कशी होती कसाबसाठी सुरक्षा

तसेच मी तळमजल्यावर होतो. तेथून एक जिना वर गेलेला आहे. त्यातील एका खोलीत कसाबचे वास्तव्य होते. आता ती खोली बंद आहे. त्या खोलीत आजही कसाबचे कपडे, त्याची पाठीवर लटकलेली बॅग आणि एके 47 गन आहे. कसाबच्या सुरक्षेसाठी इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिसांची एक तुकडी होती. कसाबच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावलेले होते. तळमजल्यावर आयटीबीपीचे पथक तैनात असे. आतमध्ये मुंगीलाही शिरता येणार नाही, अशी सुरक्षा व्यवस्था होती. कसाबला त्याच यार्डातून शेवटी फाशी देण्यासाठी नेण्यात आले होते. परंतु कसाबच्या कटू आठवणींचे ठसे तिथे आजही जिवंत आहेत, अशी माहिती राऊतांनी त्यांच्या नव्या पुस्तकात दिलेली आहे.

शरद पवारांच्या त्या खास माणसाचा उल्लेख

राऊतांनी पुढे कसाबची कोठडी तयार करण्यासाठी मदत करणाऱ्या शरद पवारांच्या त्या खास माणसाचा उल्लेख केलेला आहे. ‘कसाबच्या कोठडीची एक गंमत सांगायला हवी. कसाब आत असताना जयंत पाटील हे गृहमंत्री होते. महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठकांना जयंत पाटील हजर असत. त्यावेळी फावल्या वेळेत ते आमच्याशी तुरुंगातील अनुभवाबाबत गप्पा मारीत,’ असे सांगून राऊतांनी एक खुलासा केला आहे. राऊतांनी जयंत पाटलांसोबतचा एक अनुभव सांगितला आहे. ‘अहो, आता तुम्ही मजा बघताय. पण आम्ही दोघे कसाबच्याच कोठडीत होतो,’ असे संजय राऊत जंयत पाटलांना म्हणाले होते. तर यावर ‘कसाबची कोठडी मला काय सांगताय. मला ती माहिती आहे,’ असं उत्तर जयंत पाटलांनी दिलं होतं. पुढे उत्सुकतेपोटी राऊतांनी तुम्ही कसाबच्या कोठडीत कधी गेले होते, असा प्रश्न जयंत पाटलांनी विचारला होता. याचे उत्तर देताना कसाबच्या कोठडीचे संपूर्ण डिझाईन मीच बनलवलेले आहे. माझ्यातला इंजिनिअर तिथे काम करून गेला, असं जयंत पाटलांनी राऊतांना सांगितल्याची नोंद राऊतांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकात केली आहे.

दरम्यान, राऊतांच्या या पुस्तकात इतरही अनेक गौप्यस्फोट आणि महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे. याच कारणामुळे सत्ताधारी भाजपा, शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्यांनी या पुस्तकावर टीका केलेली आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.