AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाहीत, त्यांना पक्षाचं कार्याध्यक्ष बनवण्याची चर्चा, यावर संजय राऊत म्हणाले..

"विधानसभेत 400 जागा होतायत. त्यासाठी नवीन विधान भवन बांधलेलं नाही. मला अशी भिती वाटते उद्या 400 जागा झाल्यावर महाराष्ट्राचे दोन तुकडे जर या लोकांनी केले तर? त्याची तयारी आहे का?"

Sanjay Raut : आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाहीत, त्यांना पक्षाचं कार्याध्यक्ष बनवण्याची चर्चा, यावर संजय राऊत म्हणाले..
Aaditya-Sanjay-Uddhav
| Updated on: Apr 15, 2026 | 10:22 AM
Share

आदित्य ठाकरे यांना कार्याध्यक्ष बनवणार अशी चर्चा आहे. त्यावर आज संजय राऊत यांनी आपलं मत मांडलं. “तुमची माहिती मला मीडियातून समजली. हे जे निर्णय असतात ते पक्षात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली घेतले जातात. उद्धव ठाकरे सुद्धा कालांतराने पक्षाचे कार्याध्यक्ष झाले होते. आदित्य ठाकरे यांचं नाव समोर आलं असेल आपल्या माध्यमातून तर स्वागत केलं पाहिजे. मीडियातील माहितीवर मी हे बोलतोय अजून असं काही ठरलेलं नाही. तरुण पिढीच्या हाती नेतृत्व देताना या सगळ्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. पुढचं राजकारण तरुणाच्या हातात गेलं पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.

आदित्य ठाकरे महाराष्ट्रात फिरत नाहीत. इतर कोणाकडे दिलं तर कमीत कमी राज्यात फिरतील असं तुमचे खासदार खासगीत बोलतात. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “खासगी बोलण्यात काही अर्थ नसतो. पक्षात अनेकदा याच्यावर पक्षाच्या संघटनेबाबत चर्चा होत असते. मुंबई पालिका निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी उत्तम पद्धतीने काम केलय. त्यांची जी टीम आहे तरुणांची, त्यांनी उत्तम काम केलय”

उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष सुरु झालेला आहे

विधान परिषदेत उद्धव ठाकरे जाणार का? “दिल्लीत विधान परिषदेवर का चर्चा व्हावी? उद्या लोकसभेत महिला आरक्षण विधेयक आहे. डिलिमिटेशनचा विषय आहे. या बिलांमुळे देशात आग लागलेली आहे. उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष सुरु झालेला आहे. मुख्यमंत्री स्टालिन यांनी सरकारला एक इशारा दिलाले आहे. हा गंभीर विषय आहे. विधान परिषदेवर कोण जाणार यावर चर्चा करण्यासाठी भरपूर वेळ आहे” असं संजय राऊत म्हणाले.

तुम्ही मिसकॉलचं एवढं काय घेऊन बसलात

महिला आरक्षण विधेयकावर तुमची भूमिका काय आहे? प्रियंका चतुर्वेदी, किशोरी पेडणेकर यांनी मिस कॉल दिला. “मिस कॉल हा मिस कॉलच असतो. तुम्ही मिसकॉलचं एवढं काय घेऊन बसलात. महिला आरक्षण विधेयकाबाबत सुरुवातीपासून शिवसेनेची भूमिका स्पष्ट आहे. महिलेच्या राजकीय हिताआड शिवसेना कधी आलेली नाही, येणार नाही. महाराष्ट्र हे पहिल राज्य आहे, जिथे महिला राजकीय आरक्षणाची स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुहूर्तमेढ रोवली गेली. महिलांना सक्षम बनवलं पाहिजे. असं नसतं, तर मुंबईच्या महापौरपदी महिला नसत्या हे ऐतिहासिक पाऊल आहे असं मोदी सांगतायत” असं संजय राऊत म्हणाले.

डिलिमिटेशन नंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा होतील?

“मतदारसंघाची पूनरर्चना न करता, जनगणनेची सुरुवात न करता हा सर्व विषय पुढे नेला जातोय, तिथे वादाचा मुद्दा आहे. डिलिमिटेशनबद्ल खूप आक्षेप आहेत. भविष्यात एक मोठा संघर्ष रस्त्यावर होऊ शकतो. महाराष्ट्रात 72 जागा होतायत. मला वाटतं 72 पेक्षा जास्त जागा झाल्या पाहिजेत. विधानसभेत 400 जागा होतायत. त्यासाठी नवीन विधान भवन बांधलेलं नाही. मला अशी भिती वाटते उद्या 400 जागा झाल्यावर महाराष्ट्राचे दोन तुकडे जर या लोकांनी केले तर? त्याची तयारी आहे का? 400 विधानसभा सदस्यांना मुंबईच्या विधान भवनात बसायला जागा नाही. आम्ही विदर्भात, नागपूरमध्ये बसतो. तुम्ही मुंबईत बसा, महाराष्ट्राच्या फाळणीजी मुहूर्तमेढ तर रोवली जाणार नाही ना, अशी सुप्त भिती माझ्या मनात आहे” असं संजय राऊत म्हणाले.

Follow Us
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?
अमरावतीत प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींचे लैंगिक शोषण?.
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे
हा देश कोणाच्या मर्जीने नाही बाबासाहेबांच्या संविधानाने चालणार - सुळे.
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; भक्तांच्या कागदपत्रांचा गैरवापर.
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी
शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांची तब्बल 8 तास कसून चौकशी.
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ
नाचता नाचताच कोसळले... गोरेगावातील ड्रग्स पार्टीमुळे खळबळ.
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश
अशोक खरात प्रकरणात ईडीची कारवाई; कोट्यवधींच्या व्यवहारांचा पर्दाफाश.
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्
त्या विधानावरून राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना घेरले, म्हणाले, ते तर खुद्.
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान
डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज ठाकरेंचे ट्वीट, राजकारण्यांचे टोचले कान.
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा
1825 कॉल्सचा गूढ उलगडणार? अंजली दमानिया उद्या करणार मोठा खुलासा.
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन
डॉ. बाबासाहेबांच्या आठवणींना उजाळा, BMCकडून छायाचित्रांचे प्रदर्शन.