AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही… आजारपण, उपचारांदरम्यान संजय राऊत पहिल्यांदाच माध्यमांसमोर, धडाडली तोफ

गेल्या महिनाभरापासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर असलेले शिवसेना नेते संजय राऊत आता माध्यमांसमोर आले. त्यांची तब्येत सुधारत असून डिसेंबरपर्यंत पूर्ण बरे होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. उपचारादरम्यानही उद्धव ठाकरेंचे लक्ष असल्याचे सांगत, राऊतांनी राजकीय पुनरागमनाची नांदी दिली. यावेळी त्यांनी शिंदे गट आणि भाजपवर नेहमीप्रमाणे जोरदार टीका केली.

Sanjay Raut :  माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही... आजारपण, उपचारांदरम्यान संजय राऊत पहिल्यांदाच माध्यमांसमोर, धडाडली तोफ
शिवेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत
| Updated on: Dec 01, 2025 | 10:47 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तब्येत बरी नसल्याने गेल्या महिन्याभरापासून ते सक्रिय दिसत नव्हते.खराब प्रकृतीमुळे संजय राऊत हे सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. मात्र आज बऱ्याच दिवसांनी ते माध्यमांच्या समोर आले आणि नेहमीप्रमाणे त्यांची तोप धडाडली. प्रकृतीबाबात, आजारपण, उपाचारांबाबात माहिती देतानाच त्यांनी शिंदे गट, भाजप, एकंदर राजकारण यावरही सविस्तर प्रतिक्रिया देत टीकास्त्रही सोडलं.

‘ माझ्यावर अद्याप उपचार सुरू आहेत आणि माझी तब्येत सुधारते आहे. पूर्ण सुधारायला अजून थोडा वेळ लागेल. 1 महिन्यापेक्षा जास्त काळ मी घरच्या आणि हॉस्पिटलच्या कैदखान्यात आहे. मा. उद्धव ठाकरे यांचं माझ्यावर बारीक लक्ष आहे, मी कुठे बाहरे पडतोय का हे पहात आहेत ते. आताही त्यांची परवानगी नाही. पण तरीही आपण सगळे आलात, बऱ्या दिवसांनी आपण भेटत आहोत. तब्येतीत थोडी सुधारण होत आहे, यापुढे अजून होईल. उपचार फार कठोर असतात, आजारापेक्षा उपचार भयंकर असतात. पण ते चालू आहेत, मला खात्री आहे की डिसेंबरनंतर मी पूर्णपणे बरा होईन येईन’, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.

‘डॉक्टरांना पूर्ण विश्वास आहे. प्रमुख डॉक्टर उपचार करत आहेत. रेडिएशनचा मुख्य भाग संपलेला आहे, इतर काही उपचार सुरू आहेत. चांगल्या प्रकारे रिकव्हरी सुरू आहे, पण माझ्यासारखा माणूस स्वस्थ बसू शकत नाही. जर बरा असतो तर नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी मी संपूर्ण महाराष्ट्रात 100 टक्के फिरलो असतो’, असंही राऊत म्हणाले.

गुलाबो गँगने सांगितलं आज लक्ष्मीदर्शन होणार – शिंदे गटावर टीकास्त्र

उद्या निवडणुका होत आहेत आणि शिंदे गटाच्या गुलाबो गँगने सांगितलं की आज (1 तारखेला)  लक्ष्मी दर्शन होणार आहे. ते आता कुठे कुठे लक्ष्मी दर्शन झालेलं आहे याची माहिती निवडणूक आयोगाने घेतली पाहिजे.  राज्याच्या मंत्र्यांनी जाहीर केलं होतं की 1 तारखेला लक्ष्मी दर्शन होणार, त्यामुळे सकाळपासून लोकं जागेच आहेत. काही ठिकाणी मतामागे 10 हजार, 15 हजार असं लक्ष्मी दर्शन होत आहे. ही नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या प्रकारे सुरू आहे, महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत नगर पालिका नगर पंचायत निवडणुकीत पैशाचा इतका खेळ झाला नव्हता.

मुळात नगरपालिका, नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार लढवतच नव्हते, ते स्थानिक पातळीवरच लोकं लढत होते. पण  आता 5 6 हेलिकॉप्टर, खाजगी विमान वापरली आहेत. नगरपालिकेसाठी सत्तेतल्या 3 पक्षातील स्पर्धा आहे अशा शब्दांत राऊतांनी हल्ला चढवला.

शिंदे सेनेचा कोथळा अमित शाहाच काढणार 

इतके कोट्यावढी रुपये खर्च करून कोणासाठी लढताय. आपापसात मारामाऱ्या सोडा. 3 पक्षातील स्पर्धा आहे. शिंदे यांची शिवसेना म्हणायला तयार नाही. मुळात शिंदे यांची जी सेना आहे, त्यांचा कोथळा अमित शाह हेच काढणार आहेत, हे वाक्यच लिहून ठेवा.  जसं त्यांनी आमचा काढायचा प्रयत्न केला होता. शिंदेंचे 35 आमदार फुटणार.  रवींद्र चव्हाण हे bjp चे प्रदेशाध्यक्ष आहेत, त्यांची नेमणूक त्यासाठीच केली आहे. त्यांना वाटतं दिल्लीचे 2 नेते आमच्या पाठीशी पण ते कोणाचेच नाहीत.

शिंदे यांचा पक्ष फुटलेला आहे, अमित शाहांनी निर्माण केलेला गट आहे. या लोकांनी कधी शिवसेने साठी खस्ता खाल्ल्यात. पैशाच्या ताकदीवर निवडणुका लढणे म्हणजेच लोकशाही नाही अशा शब्दांत राऊतांनी टीका केली.

ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.