बंडखोर खासदारांना जबर धक्का? अपात्रतेसाठी…ठाकरे गटाचा प्लॅन समोर येताच खळबळ; काय घडणार?

संजय राऊत यांनी आज (18 जून) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच आता भविष्यात ठाकरे गट नेमकं काय करणा, हेदेखील त्यांनी सविस्तरपणे सांगितले. आता आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, कायदेशीर आणि कोर्टाची लढाईदेखील लढवली जाईल, असे राऊत म्हणाले आहेत.

बंडखोर खासदारांना जबर धक्का? अपात्रतेसाठी...ठाकरे गटाचा प्लॅन समोर येताच खळबळ; काय घडणार?
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 18, 2026 | 3:06 PM

Sanjay Raut : उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या एकूण सहा खासदारांनी बंडखोरी केली आहे. ही बंडखोरी रोखण्यासाठी ठाकरे गटकडून प्रयत्न केले जात आहे. परंतु आता जवळजवळ हे सहा खासदार आता ठाकरे यांच्या हातातून निसटल्याचे बोलले जात आहे. लवकरच बंडखोर खासदार एकनाथ शिंदे यांच्या पक्षात सामील होणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या बंडखोर खासदारांची आगामी भूमिका लक्षात घेऊन आता ठाकरे गटही अलर्ट मोडवर गेला आहे. ठाकरे गटाने आता कायदेशीर मार्गाने या बंडखोर खासदारांची नाकेबंदी करायला सुरुवात केली आहे. हे खासदार अपात्र ठरावेत म्हणून आता ठाकरे गटाने प्लॅन आखला आहे. हाच प्लॅन ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितला आहे.

बैठकील कोण हजर कोण गायब

संजय राऊत यांनी आज (18 जून) पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. तसेच आता भविष्यात ठाकरे गट नेमकं काय करणा, हेदेखील त्यांनी सविस्तरपणे सांगितले. आता आम्ही रस्त्यावरची लढाई लढू, कायदेशीर आणि कोर्टाची लढाईदेखील लढवली जाईल, असे राऊत म्हणाले आहेत. “आज आमच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. या बैठकीत आमचे लोकसभेचे तीन खासदार आले होते. राजभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे तीन खासदार बैठकीला उपस्थित होते. बाकीचे खासदार आलेले नाहीत. आम्ही उपस्थित नसलेल्या खासदारांना कारणे दाखवा नोटीस दिलेली आहे. आम्ही त्यांना उत्तर देण्यासाठी सात दिवसांची मुदत दिलेली आहे,” अशी माहिती राऊत यांनी दिली.

नियमानुसार काम झालं तर खासदार अपात्र ठरणार

तसेच, आता प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांना अपात्र ठरवण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी करू. लोकसभेच्या अध्यक्षांनी नियम, कायदा आणि सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमानुसार काम केलं तर हे खासदार अपात्र ठरतील. आम्ही लोकसभेची प्रक्रिया अगोदर पूर्ण करणार. नंतर आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाऊ. आम्ही सगळ्या प्रक्रिया पार पाडू, असेही राऊत म्हणाले.

Follow Us