Sanjay Raut : स्वत:ची पोरं जन्माला घाला, दुसऱ्यांची पोरं किती वेळ खेळवणार तुम्ही ? राऊतांचा भाजपावर हल्लाबोल
आशिष शेलार यांच्या ठाकरे बंधूंवरील हिंदुत्व टीकेला संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले. राऊत यांनी भाजपवर "स्वतःची पोरं जन्माला घाला" म्हणत नेतृत्वावरून हल्ला चढवला. भाजपमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादीतून आलेले ९०% लोक आहेत, असे सांगत त्यांनी भाजपच्या मूळ नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शिवाजी पार्कपासून ते टिळक भवनापर्यंत जाईपर्यंत हिंदुत्वाचा रंग जिरलाय असं म्हणत आशिष शेलार यांनी राज व उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंना टोला लगावला. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. राज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊ नका, उगाच नाटक करायला जाऊ नका. भाजपकडे स्वत:चं काय आहे ? असा सवाल त्यांनी विचारला. त्यांना म्हणो, स्वत:ची पोरं जन्माला घाला, दुसऱ्यांची पोरं किती वेळ खेळवणार तुम्ही ? असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला. तसेच राज व उद्धव ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू सोबत राहण्यासाठीच एकत्र आले आहेत, ते एकत्र काम करतील असंही राऊत यांनी नमूद केलं.
काय म्हणाले राऊत ?
आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर केलेल्या टीकेला राऊतांनी चोख प्रत्युत्तर दिलं. ‘ त्यांना म्हणावं राज ठाकरेंकडे चहा प्यायला जाऊ नका, उगाच नाटक करायला जाऊ नका. त्या दोघांचेही रंग पक्के आहेत, ठाकऱ्यांचा रंग खरवडून काढण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. ते पक्के रंग आहेत. भाजपचा रंग राहिला आहे का ? भारतीय जनता पक्षाचा रंग हा भ्रष्टाचारारा रंग आहे, काँग्रेसचा रंग आहे. त्या पक्षामध्ये 90 टक्के काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आहे की नाही हे शेलांरानी सांगावं. भाजपमध्ये स्वत:चं नेतृत्व आहे का ? मला आश्चर्यच वाटतं, हे सगळे काँग्रेस आणि एनसीपीतून वगैरे आलेले लोकं आणि म्हणतात की हे भाजपचे नेते आहेत’ अशी आठवण राऊत यांनी करून दिली.
स्वत:ची पोरं जन्माला घाला की…
कालपर्यंत हे सगळे आमच्याच छत्राखाली होते, काल शिवाजीराव कर्डिली वारवले, बातम्या चालल्या की भाजप नेत्याचं निधन, कसं काय ? त्यांचं आयुष्य काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलं. ते काही काळ शिवसेनेमध्ये होते, भाजपमधले 90 टक्के लोकं काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रावादीतले आहेत त्यांच्याकडे स्वत:चं काय आहे ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. स्वत:ची पोरं जन्माला घाला म्हणो, दुसऱ्यांची पोरं किती वेळ खेळवणार तुम्ही ? असा टोलाही राऊतांनी भाजपला लगावला.
