सातारा-सांगलीतून मोठी बातमी… विधान परिषदेबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा आदेश, एकही मत…

Satara Sangli MLC Election : सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपच्या धैर्यशील कदम यांनी उमेदवारी जाहीर झालेली आहे. आता एकनाथ शिंदे यांनी या मतदारसंघातील शिवसेनेच्या नगरसेवकांना मोठा आदेश दिला आहे.

सातारा-सांगलीतून मोठी बातमी... विधान परिषदेबाबत एकनाथ शिंदेंचा मोठा आदेश, एकही मत...
Eknath Shinde on Satara sangli mlc Election
Image Credit source: Google
| Updated on: Jun 16, 2026 | 4:44 PM

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीसाठी 18 तारखेला मतदान पार पडणार आहे. सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून भाजपच्या धैर्यशील कदम यांनी उमेदवारी जाहीर झालेली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीकडून अभयसिंह जगताप हे निवडणूकीच्या रिंगणात आहेत. मात्र सातारा सांगलीत भाजप आणि शिवसेनेत काही मतभेद असल्याचे समोर आले होते. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक कुणाला मतदान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा आदेश दिला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शंभूराज देसाईंना सादर केला होता अहवाल

आज पालकमंत्री शंभूराज यांनी सर्व नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. यात देसाई यांनी पदाधिकाऱ्यांचे मते जाणून घेतली होती. या बैठकीनंतर देसाई यांनी याबाबतचा अहवाल एकनाथ शिंदे यांना सादर केला होता. देसाई यांनी म्हटले होते की, ‘शिंदे साहेब जो निर्णय घेतील, जो आदेश देतील, शिंदे साहेब सांगतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल. फक्त आमची भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवा असं पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.’

एकही मत फुटका कामा नये – शिंदे

शंभूराज देसाई यांचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. सातारा-सांगली विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेच्या प्रत्येक नगरसेवकाचे मत महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम यांनाच पडले पाहिजे. शिवसेनेचे एकही मत फुटता कामा नये. असा आदेश शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांना दिले आहेत. यामुळे आता या ठिकाणी असलेल्या वादावर पडदा पडला असून महायुतीच्या उमेदवाराचा विजय पक्का झाला आहे.

महायुतीकडे संख्याबळ…

सातारा-सांगली विधान परिषद मतदार संघात विजय मिळविण्याइतके संख्याबळ महायुतीकडे आहे. भाजप हा या मतदारसंघातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे भाजपने आता आपले सर्व नगरसेवक अज्ञात स्थळी रवाना केले असल्याची माहिती समोर आली आहे. या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धत असल्यानं धक्कादायक निकाल लागू शकतो. त्यामुळे सर्वच पक्ष खबरदारी घेत असल्याचे समोर आले आहे.

Follow Us