बंडातात्या कराडकर यांच्या मठात पोलीस!! सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी सुरु

साताऱ्यातल्या पिंजर येथील बंडातात्या यांच्या मठात सातारा पोलीस पोहोचले आहेत. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे. 

बंडातात्या कराडकर यांच्या मठात पोलीस!! सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याची चौकशी सुरु
बंडातात्यांच्या मठात पोलीस दाखल
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 9:41 AM

सातारा: सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडे (Supriya Sule and Pankaja Munde) यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांना चांगलंच महागात पडणार असं दिसतंय. राज्य महिला आयोगाने या वक्तव्याची गंभीर दखल घेतली असून महिलांबाबतचं अशा प्रकारचं वक्तव्य खपवून घेणार नाही असा इशारा दिला होता. तसंच सातारा पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करून यासंदर्भातला अहवाल दोन दिवसात सादर करावा, असा आदेश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी काल दिला होता. त्यानुसार आज सकाळीच बंडातात्या कराडकर यांच्या मठात साताऱ्याचे पोलीस पोहोचल्याची माहिती हाती आली आहे. आता पोलीस बंडातात्यांवर काय कारवाई करणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. साताऱ्यातल्या पिंजर येथील बंडातात्या यांच्या मठात सातारा पोलीस पोहोचले आहेत. पोलिसांकडून त्यांची चौकशी सुरु आहे. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे.

सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य!

प्रसिद्ध कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले. महाविकास आघाडी सरकारच्या वाइन विक्रीधोरणाविरोधात बोलताना त्यांनी सुप्रिया सुळे आणि पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर सर्वपक्षीय महिला नेत्यांनी आक्रमक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महिलांच्या आत्मसन्मानाला व प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आहे. असं ट्विट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं. होतं.

सर्वपक्षीय महिला नेत्या आक्रमक

– शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी बंडातात्या कराडकर यांच्या वक्तव्यावर तीव्र आक्षेप नोंदवला. स्वतःला कीर्तनकार म्हणवतात पण स्त्रीत्वाचे असे धिंडवडे काढतात. स्त्रियांचा जाहीररित्या अपमान खपवून घेतला जाणार नाही. बंडा तात्यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा पोलिसांनी त्यांना जाब विचारावा, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली. – काँग्रेस खासदार नवनीत राणा यांनीही बंडातात्या यांच्या या वक्तव्याचा समाचार घेतलाय. आम्ही वाइनच्या विरोधात आहोत. या निर्णयावर महाराष्ट्रातील आम्ही सगळ्या महिला विरोधात आहोत. पण बंडातात्या कराडकर यांचं महिलांबाबतचं वक्तव्य, अशा प्रकारचं बोलणं आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला. – राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या रुपाली पाटील यांनीही बंडातात्यांवर जोरदार टीका केली आहे. बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितलीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

इतर बातम्या-

Video | बुलंदशहरमध्ये जोरदार पाऊस, प्रियंका गांधी यांचा रोड शो | UP Elections 2022

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं परीक्षांच वेळापत्रक केलं जाहीर, ऑनलाईन पद्धतीनेच होणार परिक्षा

Non Stop LIVE Update
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा
एक-दोन दिवस थांबा मग संदीपान भूमरेंवर...,ठाकरे गटाच्या नेत्यांचा इशारा.
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार
ईडीच्या 'त्या' वक्तव्यावरून अमोल कोल्हेंनी घेतला सदाभाऊ खोतांचा समाचार.
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला...
शेंडगेंच्या गाडीवरील हल्ल्यावर भुजबळ म्हणाले, पण मी कुणाच्या बापाला....
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक
मराठा समाज गप्प बसणार नाही, ओबीसी नेत्याला धमकी अन् गाडीवर शाईफेक.