Shivendraraje Bhosle: उगीच डिवचू नका… शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचा कुणाला इशारा? साताऱ्यात संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर
Shivendraraje Bhosle on Shashikant Shinde: साताऱ्यात पुन्हा वाद उफळला आहे. मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी जंगल मे घुमते वक्त जंगल खामोश है इसका मतलब ये मत समझो की जंगल मे शेर नही है, असा इशारा दिला आहे.

सातारा आणि जावळी मतदारसंघात भाजपचे नेते आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले तर शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. साताऱ्यातील संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. जंगल मे घुमते वक्त जंगल खामोश है इसका मतलब ये मत समझो की जंगल मे शेर नही है, असा खणखणीत इशारा भोसले यांनी दिला आहे. दहीहंडी उत्सवात त्यांनी विरोधकांसह शिंदे यांना हा इशारा दिल्याचे मानले जात आहे.
उगीच डिवचू नका
सातारा जिल्हा बँकेची निवडणूक आता हळूहळू रंगात येऊ लागली आहे. या निवडणुकीत ठराव घेण्यावरून सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यात गेल्या काही दिवसांपूर्वी संघर्ष पाहायला मिळाला होता.त्यानंतर जावळीतील राजकीय वातावरण हे अजूनही गरमच असल्याचे पाहायला मिळत आहे. जावळीतील दहीहंडी उत्सवा दरम्यान सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेत विरोधकांना इशारा दिला आहे.
यावेळी बोलत असताना ते म्हणाले जंगल मे घुमते वक्त जंगल खामोश है इसका मतलब ये मत समझो की जंगल मे शेर नही है उगीच आम्हाला डीवचण्याचे काम करू नका तुम्हाला परवडणार नाही, असा इशारा यावेळी बोलत असताना शिवेंद्रसिंह राजे यांनी शशिकांत शिंदे यांचे नाव न घेता दिला.
जिल्ह्यात वर्चस्वाची लढाई
शिवेंद्रराजे भोसले हे भाजपचे आमदार आणि मंत्री आहेत. तर शशिकांत शिंदे हे महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते आहेत. सातारा-जावळी भागात या दोघांमध्ये विस्तवही जात नाही. राजकीय वर्चस्व आणि रस्सीखेचमुळे त्यांच्यात अनेकदा वाद झाल्याचे समोर आले आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीदरम्यान आणि विविध सहकारी संस्थांच्या ठरावांवर या दोन्ही नेत्यांच्या गटांमध्ये नेहमी राजकीय स्पर्धा दिसून आली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांपासून दोन्ही नेते एकमेकांवर तोंडसुख घेत आलेले आहे. आता जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठरावामुळे दोन्ही नेत्यांमध्ये पुन्हा एकदा तु तु मैं मैं सुरू झाली आहे.
