सिल्व्हर ओक हल्ल्यात अटक झालेल्या महिला वाहकाचे निधन; कराड आगारातील पहिल्या महिला वाहक होण्याचा मान

एसटी आंदोलनातील सुषमा नारकर यांच्याआधी काही कर्मचाऱ्यांचेही निधन झाले आहे. सुषमा नारकर यांनी या आंदोलनात पहिल्यापासून सहभाग नोंदविला होता. सिल्व्हर ओकवर कर्मचाऱ्यांनी हल्ला केला त्यावेळी त्या मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

सिल्व्हर ओक हल्ल्यात अटक झालेल्या महिला वाहकाचे निधन; कराड आगारातील पहिल्या महिला वाहक होण्याचा मान
एसटी आंदोलनातील महिला वाहकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 6:00 PM

कराडः राज्यातील परिवहन महामंडळाच्या चालक वाहकांचे आंदोलन (driver conductors agitation) चिघळल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी थेट राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला. त्यानंतर एसटी आंदोलनकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती. त्यावेळी सिल्व्हर ओकवरील (Silver Oak Bungalow) एसटी आंदोलनात सहभाग घेतलेल्या अटक झालेल्या महिला वाहकाचे निधन झाले आहे. त्यामुळे एसटी कामगारांसह कराड तालुक्यातून त्यांच्या या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे. कराड आगारातील ज्या महिला वाहक यांचे निधन झाले आहे त्यांचे नाव सुषमा नारकर (Sushma Narkar Death) असून त्यांच गाव कराड तालुक्यातील येवती आहे.

सुषमा नारकरांना आठ दिवस तुरुंगवास

सिल्व्हर ओकवरील आंदोलनानंतर त्यांना अटक झाली होती. त्यांना अटक झाल्यानंतर त्या आठ दिवस तुरुंगातच होत्या. काही दिवसानंतर त्यांना जामीन मिळाला होता. त्यांची जामिनावर सुटका झाल्यापासून त्या आजारी होत्या. त्या आजारपणातच त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे त्यांच्या राहत्या घरीच निधन झाले.

पहिल्या महिला वाहक होण्याचा मान

महाराष्ट्र एसटी महामंडळाच्या कराड आगारातील पहिल्या महिला वाहक होण्याचा मान सुषमा नारकर यांना मिळाला होता.

वाहक म्हणून 22 वर्षे सेवा

सुषमा नारकर 2000 मध्ये त्या कराड एसटी आगारात वाहक म्हणून दाखल झाल्या होत्या. त्यानंतर सुमारे 22 वर्षे त्यांनी वाहक म्हणून एसटीमध्ये सेवा दिली होती. गतवर्षी परिवहन महामंडळाचे शासनात विलिनीकरण व्हावे यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केले होते. त्यामध्ये सुषमा नारकर यांनीही सहभाग घेतला होता.

पहिल्या दिवसांपासून आंदोलनात सहभाग

एसटी आंदोलनातील सुषमा नारकर यांच्याआधी काही कर्मचाऱ्यांचेही निधन झाले आहे. सुषमा नारकर यांनी या आंदोलनात पहिल्यापासून सहभाग नोंदविला होता. सिल्व्हर ओकवर कर्मचाऱ्यांनी हल्ला केला त्यावेळी त्या मुंबईतील आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर सिल्व्हर ओकवर कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत हल्ला केला त्यावेळी त्यांना मुंबईत पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

आंदोलनानंतर आजारी

त्यांनंतर काही दिवसांनी त्यांना जामीन मंजूर झाला होता, मात्र जामीन मिळाल्यानंतर त्या घरी आल्यापासून आजारीच होत्या. काही दिवस त्यांच्या उपचार करण्यात आले होते, मात्र त्या आजारपणातच त्यांच्या राहत्या घरी त्यांचे निधन झाले. त्यांच्या या निधनामुळे परिसरातून आणि कर्मचारीवर्गातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.