विखेंच्या सगळ्यात जवळचे अन् मुर्ख, नीच…; जयश्री थोरातांवरच्या शाब्दिक हल्ल्यानंतर सत्यजीत तांबे संतापले

Satyajeet Tambe About Jayashree Balasaheb Thorat : बाळासाहेब थोरात यांच्या मुलीबाबत वादग्रस्त विधान करण्यात आलं आहे. त्यानंतर संतापाची लाट निर्माण झाली आहे. बाळासाहेब थोरातांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी ट्विट करत या विधानाचा निषेध केला आहे. त्यांनी विखेंवर टीका केलीय. वाचा...

विखेंच्या सगळ्यात जवळचे अन् मुर्ख, नीच...; जयश्री थोरातांवरच्या शाब्दिक हल्ल्यानंतर सत्यजीत तांबे संतापले
जयश्री थोरात, सत्यजीत तांबेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 10:19 AM

काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करण्यात आलं आहे. संगमनेरमधील धांदरफळमध्ये भाजपचे नेते, माजी खासदार सुजय विखे पाटील यांची सभा झाली. या सभेत भाजपचे नेते वसंतराव देशमुख यांनी बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यानंतर जयश्री यांचे आत्ये भाऊ सत्यजीत तांबे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुजय विखे यांच्या सगळ्यात जवळचे आणि तालुक्यातील सगळ्यात मुर्ख.., असा वसंतराव देशमुख यांचा उल्लेख सत्यजीत तांबे यांनी केला. नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असं सत्यजीत तांबे म्हणालेत.

सत्यजीत तांबे यांचं ट्विट

आज सुजय विखे यांच्या उपस्थितीत त्यांचे सर्वात जुने, सगळ्यात जवळचे व तालुक्यातील सगळ्यात मुर्ख म्हणून ओळखले जाणारे वसंत देशमुख यांनी आमची बहिण डॉ. जयश्री थोरात हिच्यावर टीका करताना जी पातळी सोडली, ती त्यांची खरी संस्कृती आहे.

ह्याच वसंत देशमुखला आमचे आजोबा स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी चांगलाच सरळ केला होता. आता परत वेळ आली आहे, अशी नीच लोकांना त्यांची जागा दाखवण्याची.

बाकी सविस्तर मी लवकरच बोलेलच.

वसंतराव देशमुख यांचं वादग्रस्त वक्तव्य

भाऊसाहेब थोरात यांची नात… ती तर बोलती म्हणत्यात… माझा बाप सगळ्याचा बाप… काही कळत नाही. तुला सुद्धा पोरं कशी झाले हा प्रश्न आहे. आपल्या कन्येला समजवा. नाहीतर आम्ही जर निवडणूक काळात मैदानात उतरलो तर तुमची मुलगी घराबाहेर पडू शकणार नाही. तिला सुजय दादा प्रेमाने ताई म्हणतात. बरोबर आहे, त्यांची संस्कृती आहे ती. पण दादा, या ताईचे पराक्रम जर पाहिले ना… सगळ्या तालुक्याला माहिती आहेत, असं विधान वसंतराव देशमुख यांनी केलं आहे.

वसंतराव देशमुख यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. जयश्री थोरात यांनी वसंतराव देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रात्रभर पोलीस स्टेशनबाहेर त्या बसून होत्या. अखेर पहाटे देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनीही आक्रमक भूमिका घेतली. त्यांनी सुजय विखे यांच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या फोडल्या. ज्यांनी गाड्या फोडल्या त्यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी सुजय विखे यांनी केली आहे.

शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता...
शपथविधी अन् नेत्यांची पदं बदलताच मंत्रालयातील पाट्या बदलल्या, आता....
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात
शपथविधी होताच CM फडणवीसांसह DCM अजितदादा अन् शिंदे थेट मंत्रालयात.
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'
CM होताच ठाकरेंचा फडणवीसांना इशारा,'...असं जाणवलं तर जाणीव करून देणार'.
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ
गुलाबी जॅकेट, वेगळ्या पद्धतीने दादांनी घेतली सहाव्यांदा DCM पदाची शपथ.
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी.
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या.
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे.
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत.