औरंगाबादमध्ये शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद; महापालिका आयुक्तांचे आदेश

औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने औरंगाबादमध्ये सर्व शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Schools in Maharashtra's Aurangabad city remain closed, astik kumar pandey's order)

  • दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद
  • Published On - 13:25 PM, 22 Feb 2021
औरंगाबादमध्ये शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद; महापालिका आयुक्तांचे आदेश

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने औरंगाबादमध्ये सर्व शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी हे आदेश दिले आहेत. (Schools in Maharashtra’s Aurangabad city remain closed, astik kumar pandey’s order)

औरंगाबाद जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत. त्यामुळे प्रशासन अॅलर्ट झाले आहे. औरंगाबादमधील शाळा आणि कोचिंग क्लासेसमध्ये गर्दी वाढल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी दिले आहेत. दोन महिन्यांपूर्वीच औरंगाबादमध्ये शाळा सुरू झाल्या होत्या. तसेच आठ दिवसांपूर्वी कोचिंग क्लासेस सुरू झाले होते. मात्र, कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महापालिका आयुक्तांनी वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शाळा, कोचिंग क्लासेस बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

काल 256 रुग्ण आढळले

औरंगाबादमध्ये 15 दिवसांपूर्वी 35 रुग्ण सापडले होते. मात्र, काल 256 रुग्ण सापडल्याने शहरात कोरोना हातपाय पसरत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे महापालिकेने कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी कंबर कसली आहे.

तर रिक्षा जप्त होणार

वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता औरंगाबाद शहरात रिक्षाचालक विनामास्क वाहन चालवताना आढळला तर त्याची रिक्षा जप्त केली जाणार आहे. औरंगाबादमध्ये तब्बल 35 हजारांपेक्षा जास्त रिक्षाचालक असून ते दररोज प्रवाश्यांना घेऊन शहरातील गल्लोगल्ली आणि इतरत्र फिरत असतात. त्यांनी मास्क न परिधान केल्यास कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून लोकांना वारंवार मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, लोक या सूचना गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आता रिक्षाचालकांवर कारवाई केली जात असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिली.

तर सीटीबसमध्ये नो एन्ट्री

औरंगाबादेतील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क असेल तरच सीटी बसमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. मास्क नसेल तर सीटी बसमध्ये नो एन्ट्री करण्यात आली आहे. इतकच नाही तर मास्क नसलेल्या लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसा निर्णय औरंगाबाद महापालिकेनं घेतला आहे. (Schools in Maharashtra’s Aurangabad city remain closed, astik kumar pandey’s order)

 

संबंधित बातम्या:

औरंगाबादेत शाळा पुन्हा बंद, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता निर्णय

कोरोनाच्या युटर्नमुळे राज्यात धोका वाढला, ‘या’ जिल्ह्यामध्ये घरं सील करण्याचा पालिकेचा निर्णय

मराठवाड्यात कोरोनाचा उद्रेक केव्हाही, बी अ‍ॅलर्ट, कामाला लागा; विभागीय आयुक्तांची ऑडिओ क्लिप व्हायरल

(Schools in Maharashtra’s Aurangabad city remain closed, astik kumar pandey’s order)