AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha OBC Dispute : वाटेल ती किंमत मोजायला तयार पण…, मराठा आरक्षणावर शरद पवारांचं सर्वात मोठं वक्तव्य

राज्यात सध्या ओबीसी समाज आणि मराठा समाज आमने-सामने आल्याचं पहायला मिळत आहे, यावर बोलताना शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, ते नाशिकमध्ये बोलत होते.

Maratha OBC Dispute : वाटेल ती किंमत मोजायला तयार पण..., मराठा आरक्षणावर शरद पवारांचं सर्वात मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 13, 2025 | 8:32 PM
Share

हैदराबाद गॅझेटच्या जीआरनंतर राज्यात मराठा समाज आणि ओबीसी समाज आमने-सामने आल्याचं चित्र आहे. यावर बोलताना आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आज शरद पवार यांच्या हस्ते नाशिकमध्ये दादासाहेब गायकवाड सभागृहाचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?  

महाराष्ट्रात सामाजिक ऐक्याची वीण उसवली जात आहे, असं वाटतंय.  सामाजिक वीण जपण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे, वाटेल ती किंमत मोजायला तयार आहे, मात्र सामाजिक ऐक्य जपायला हवं, असं वक्तव्य शरद पवार यांनी राज्यात सध्या सुरू असलेल्या मराठा आणि ओबीस संघर्षाच्या पार्श्वभूमीवर केलं आहे.

पुढे बोलताना शरद पवार यांनी म्हटलं की, हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम आहे.  दादासाहेब गायकवाड यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रोत्साहन दिलं, त्यामुळे ते नोकरी सोडून समाजकारण आणि राजकारणात आले, बाबासाहेबांनी पक्ष काढला होता, दादासाहेब गायकवाड यांना त्या पक्षातून उमेदवारी मिळाली होती, आणि ते निवडून देखील आले.   तेव्हाचा काळ वेगळा होता, तो संयुक्त महाराष्ट्राचा काळ होता. त्या चळवळीमध्ये नाशिकचा वाटा मोठा आहे. नंतर महाराष्ट्र राज्य निर्माण झाले. तेव्हा महाराष्ट्राचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण करत होते. तेव्हाच देशावर मोठं संकट आलं, चीनने भारतावर आक्रमण केलं. त्यावेळी अस्वस्थता निर्माण झाली. चीनचे आक्रमण झाले तेव्हा संरक्षण खात्याची जबाबदारी व्यवस्थित पाळली गेली नाही, म्हणून तेव्हाच्या संरक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.

तेव्हा यशवंतराव मुख्यमंत्री होते, त्यांना नेहरूंनी बोलावून घेतले. चीनच्या आक्रमणानंतर सैन्यदलाचं मनोबल खचलं होतं, तेव्हा चव्हाण साहेबांनी जबाबदारी घेतली होती. देशाच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची बाब होती. 1957 ला  संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर 62 ला यशवंतरव चव्हाण हे लोकसभेचे सदस्य झाले. नाशिकने चव्हाण साहेबांना बिनविरोध निवडून दिले हा इतिहास आहे. दादासाहेब यांच्या निमित्ताने काँग्रेससोबत आरपीआयची पहिल्यांदा युती झाली. सामाजिक ऐक्य जपण्यासाठी महाराष्ट्राने प्रयत्न केले, त्याचे श्रेय यशवंतराव चव्हाण आणि दादासाहेब गायकवाड यांना दिले पाहिजे, असं यावेळी शरद पवार यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?.

उद्धव ठाकरेंचा राहुल गांधींना फोन; काय झाली चर्चा?

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका.

CM Vijay : ज्या मुद्यावरुन आज तरुण मुलं रस्त्यावर उतरलीयत, त्या नीट परीक्षेसंदर्भात विजय यांची एकदम वेगळी भूमिका

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?.

झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यापूर्वी श्रेयसची डोकेदुखी झाली कमी, प्लेइंग 11 चा निर्णय कसा घेणार?

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं.

Fifa World Cup स्पेनने जिंकला पण फायदा मिया खलिफाला, एका रात्रीत मालामाल झाली, तब्बल 14 कोटी कमावलं

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?.

Congress: भाजप कार्यालयाबाहेर काँग्रेस आक्रमक, कॉक्रोच जनता पार्टीला पाठिंब्यासाठी भर पावसात आंदोलन, पोलीस येताच घडलं काय?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..