AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : राज्य आमच्या हातात आलं म्हणून एक गट अस्वस्थ, आंदोलनाचा दोष कर्मचाऱ्यांना नाही, पवारांचा थेट इशारा कुणाकडे?

आज शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमरावतीतून विरोधकांवर जोरदार तोफ डागली आहे. राज्य आपल्या हातात आलंय, पण राज्य त्यांच्या हातात राहील नाही म्हणून एक वर्ग अस्वस्थ आहे(BJP). देशातील सत्तेचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार संकटात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. असा थेट आरोप त्यांनी केला आहे.

Sharad Pawar : राज्य आमच्या हातात आलं म्हणून एक गट अस्वस्थ, आंदोलनाचा दोष कर्मचाऱ्यांना नाही, पवारांचा थेट इशारा कुणाकडे?
शरद पवारांची विरोधकांवर सडकून टीकाImage Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 10, 2022 | 10:39 PM
Share

अमरावती : दोन दिवसांपूर्वीच शरद पवारांच्या (Sharad Pawar) घरावर झालेल्या आंदोलनाने (St Woker Protest) राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहेत. त्यानंतर राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाचा पूर आलाय. आज शरद पवार हे अमरावती दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमरावतीतून विरोधकांवर जोरदार तोफ डागली आहे. राज्य आपल्या हातात आलंय, पण राज्य त्यांच्या हातात राहील नाही म्हणून एक वर्ग अस्वस्थ आहे(BJP). देशातील सत्तेचा वापर करुन महाराष्ट्रातील सरकार संकटात आणण्याचे प्रयत्न सुरु आहे. सतत काही ना काहीही करुन तीन्ही पक्षाला त्रास दिला जातोय. मात्र शेवटी आपली सामुहिक शक्ती तयार केली तर हे प्रयत्न हानून पाडू, असे म्हणत पवारांनी भाजपवर पुन्हा अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय तपास यंत्रणांवरूनही पवार भाजपवर सतत आरोप करत आहेत.

संकटांना घाबरून जायचं नसतं

गेले 40 वर्षे एसटी कर्मचाऱ्यांसाठी काम केल. कालच्या घरावरच्या हल्ल्यात कामगारांना दोष नाही, नेतृत्व चुकीचं असलं की असं होतं, सैनिकही चुकीच्या दिशेला जातात. सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांना काही लोकांनी भडकवलं, असा आरोप शरद पवारांनी केला आहे. तसेच नरसिंहराव यांच्या काळात दंगली झाल्या. दंगली नंतर मी महाराष्ट्रात आलो तेव्हा दंगली झालेल्या भागात मी जायचो. तेव्हा हिंदू- मुस्लीम दंगल घडवण्याचा डाव होता. तेव्हा शुक्रवारी बॅाम्बस्फोट झाला आणि सोमवारी मुंबई शहर सुरळीत सुरु केलं होतं. अशी संकट येतात त्यातून सावरावं लागतंय, असेही पवार म्हणाले. तसेच खिलारीला भुकंप झाला तेव्हा 800 लोक मृत्यूमुखी पडले होते, मोठं संकट आलं होतं. त्या संकटाच्या काळातंही सावरलं. एका महिन्यात प्रत्येकाची घरं बांधून दिली. संकट आल्यावर घाबरुन जायचं नसतं त्याला तोंड द्यायचं असतं, कालचं संकट काही संकट नाही. त्याला महत्त्व द्यायचं नाही, असा टोला पवारांनी लगावला आहे.

देशात फूट पाडण्याचं काम सुरू

तसेच काश्मीरी पंडितांवर दहशतवाद्यांनी हल्ले केले होते. आता एका चित्रपटात हिंदूंवर अत्याचार कसा होतो हे दाखवले. काश्मीर फाईल चित्रपट बघीतला पाहिजे असं आवाहन केंद्र सरकरने केलं. तेव्हा देशात व्ही. पी. सिंग यांचे सरकार होतं त्याला भाजपचा पांठिबा होता. याला भाजप जबाबदार आहे. हे देशाच्या एकतेला सुरुंग लावण्याचं काम आहे. याविरोधात लोकांनी एकत्र यायला हवं. जातीयवाद, धर्मांच्या नावावर राजकारण करतात अशांच्या विरोधात उभं राहयचंय, असेही पवार म्हणाले. तसेच महागाई वाढत आहे. पेट्रोल-डिझेलच्या महागाईने सर्वत्र महागाई वाढते. देशात बेरोजगारी आहे. सरकार देशाच्या समोरच्या प्रश्नाला सहकार्य करत नाही. तसेच कुणी राज्या-राज्यात संघर्ष निर्माण करत असेल तर एकत्र यायला हवं, असे आवाहन यावेळी पवारांनी केलं.

Mumbai Police : गावदेवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित, पवारांच्या घराबाहेरील राड्यानंतर मोठी कारवाई

पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं! यशोमती ठाकूरांचं मोठं विधान

CM Uddhav Thackeray : मोदींनी रेशन दिलं पण आता रिकामा सिलेंडर वाजवायचा का? महागाईवरून मुख्यमंत्र्यांचा केंद्रावर निशाणा

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.