AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जर युद्ध थांबले नाही, तर… शरद पवारांकडून भीती व्यक्त, म्हणाले पंतप्रधानांनी…

आखाती देशांतील युद्धामुळे भारतात निर्माण होणारा गॅस आणि इंधन टंचाई, तसेच केंद्र सरकारची भूमिका यावर शरद पवारांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत सविस्तर मार्गदर्शन केले.

जर युद्ध थांबले नाही, तर... शरद पवारांकडून भीती व्यक्त, म्हणाले पंतप्रधानांनी...
sharad pawar
| Updated on: Mar 24, 2026 | 9:37 AM
Share

सध्या आखाती देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिका, इस्त्रायल आणि इराण यांच्यात तीव्र युद्ध सुरु आहे. यामुळे भारताला इंधन टंचाईचा सामना करावा लागत आहेत. त्याच आता यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार भाष्य केले आहे. आखाती देशांमध्ये धगधगत असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे भारताला येणाऱ्या काळात मोठ्या टंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकासआघाडीच्या आमदारांनी एकमताने शरद पवारांनी निवडून दिले. या निवडणुकीत मिळावलेल्या विजयानंतर त्यांनी महाविकासाआघाडीतील सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जागतिक स्तरावरील गंभीर घडामोडींवर प्रकाश टाकला. यावेळी गॅस आणि इंधन टंचाईचे संकटावर भाष्य केले.

जागतिक राजकारणात आखाती देशांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. तिथल्या युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचा थेट परिणाम भारताच्या ऊर्जा सुरक्षेवर होत आहे. जर युद्ध थांबले नाही, तर घरगुती आणि व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण होऊन दर गगनाला भिडू शकतात. तसेच कच्च्या तेलाच्या आयातीवर परिणाम झाल्यामुळे भविष्यात पेट्रोल आणि डिझेलच्या टंचाई निर्माण होऊ शकते. युद्धाची झळ आता केवळ सीमेपुरती मर्यादित नसून ती सामान्यांच्या किचनपर्यंत पोहोचली आहे, असे विधान शरद पवारांनी केले.

पंतप्रधानांच्या भूमिकेवर भाष्य

या गंभीर विषयावर केंद्र सरकारच्या संथ प्रतिसादावरही शरद पवारांनी बोट ठेवले. आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी मोठी उलथापालथ होत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इतक्या दिवसांनी यावर भाष्य करणे योग्य नाही, अशी टीका शरद पवारांनी केली. भारताने आपली मुत्सद्दी भूमिका अधिक वेगाने मांडण्याची गरज आहे, असे शरद पवारांनी म्हटले.

दरम्यान हा कार्यक्रम केवळ स्नेहभोजन नसून महाविकास आघाडीची शक्ती दाखवणारा ठरला. राज्यसभेवर निवडून दिल्याबद्दल शरद पवारांनी सर्व आमदारांचे मनापासून आभार मानले. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे यांच्यासह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व बडे नेते उपस्थित होते. आगामी राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मविआमध्ये असलेली ही एकजूट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

आखाती देशांमध्ये भडकलेली युद्धाची ठिणगी आता केवळ सीमांपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर तिचे रूपांतर एका भीषण जागतिक संकटामध्ये झाले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील या संघर्षाने मध्यपूर्वेतील शांतता पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. या युद्धामुळे केवळ जीवितहानीच होत नाही, तर जागतिक पुरवठा साखळी आणि ऊर्जा क्षेत्रालाही मोठा तडा गेला आहे. जर ही परिस्थिती लवकर नियंत्रणात आली नाही, तर संपूर्ण जगाला एका न भरून येणाऱ्या आर्थिक आणि मानवीय संकटाचा सामना करावा लागेल.

Follow Us
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल