.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar : शरद पवार पुन्हा मैदानात; ही तर सुरुवात…, नाशिकमधून सरकारला मोठा इशारा

नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला, या मोर्चामध्ये बोलताना शरद पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे, त्यांनी थेट इशारा दिला आहे.

Sharad Pawar : शरद पवार पुन्हा मैदानात; ही तर सुरुवात..., नाशिकमधून सरकारला मोठा इशारा
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 15, 2025 | 4:00 PM
Share

नाशिकमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज आक्रेश मोर्चा निघाला आहे, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीनं आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे, या मोर्चामध्ये बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. शेतकऱ्यांच्या संकटांवर मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारची आहे, राज्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे, गेल्या दोन महिन्यांमध्ये दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार?

या आक्रोश मोर्चामध्ये बोलताना शरद पवार यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या संकटांवर मार्ग काढण्याची जबाबदारी सरकारची आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे,  गेल्या दोन महिन्यांमध्ये राज्यात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, मराठवाड्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. कर्जामुळे अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत,  शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही, नाशिकमध्ये ही तर सुरुवात आहे, असा इशाराही यावेळी  शरद पवार यांनी सरकारला दिला आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, मी कृषीमंत्री होतो, शेतकरी आत्महत्येची घटना माझ्या वाचनात आली,  तेव्हा मी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना विनंती केली की शेतकरी जीव का देतो? हे समजून घेतले पाहिजे. दिल्लीत बसून हे होणार नाही, त्यासाठी जिल्ह्यांना भेटी दिल्या पाहिजे. ते तयार झाले. आम्ही नागपूर, अमरावती, यवतमाळला गेलो, ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या होत्या त्यांच्या कुटुंबाला भेटलो. त्यावेळी त्या शेतकऱ्याची बायको ढसाढसा रडली, मी आत्महत्येचं कारण विचारलं, तर ती म्हणाली सोसायटीचं कर्ज काढले होते, खासगी सावकाराचं कर्ज थकलं होतं. तो येऊन भांडे घेऊन गेला, आणि इकडे मालकांनी जीव दिला. कर्जबाजारीपणा हा मोठा रोग आहे, त्याव उपचार केले पाहिजेत,  म्हणून 70 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी दिली असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर