AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किंमत मोजावी लागेल; महागाईवरून शरद पवारांचा इशारा, फडणवीसांचं थेट उत्तर, म्हणाले योग्यवेळी…

राज्यात महागाई वाढत आहे, पेट्रोल, डिझेलच्या दरात आधीच वाढ करण्यात आली आहे. आता गॅस देखील महाग झाला आहे, दरम्यान वाढत्या महागाईवर प्रतिक्रिया देताना त्याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळेला कळेल असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. दरम्यान त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांच्या या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

किंमत मोजावी लागेल; महागाईवरून शरद पवारांचा इशारा, फडणवीसांचं थेट उत्तर, म्हणाले योग्यवेळी...
Devendra Fadnavis, Sharad PawarImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 07, 2026 | 3:52 PM
Share

देशसह राज्यात महागाई वाढतच चालली आहे. काही दिवसांपूर्वी पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली होती, त्यानंतर आता गॅस सिलिंडरचे दर देखील वाढले आहेत. गॅस सिलिंडरचे दर प्रति सिलिंडर 29 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. दरम्यान वाढत्या महागाईविरोधात राज्यात सरकारविरोधात विरोधकांचं आंदोलन सुरू आहे. या  सर्व पार्श्वभूमीवर बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारला मोठा इशारा दिला आहे. याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळेला कळेल, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले शरद पवार? 

देशभरात वाढत असलेल्या महागाईवर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. महागाई वाढत आहे, याचा थेट परिणाम हा सर्वसामान्य लोकांवर होत आहे. पंतप्रधानांनी सुरुवातीला सांगितलं, की आम्ही महागाई नियंत्रित करतोय. नियंत्रित याचा अर्थ टप्प्याटप्प्याने हा धक्का द्यायचा हे त्यांचं सूत्र आहे, याची राजकीय किंमत सत्ताधाऱ्यांना योग्य वेळेला कळेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. दरम्यान शरद पवार यांच्या या विधानावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

नेमकं काय म्हणाले फडणवीस? 

जगात युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे जगात असा एकही देश नाही जिथे पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे भाव वाढलेले नाहीत.  सगळीकडे वाढलेले आहे. निश्चितपणे केंद्र सरकार त्याची चिंता करत आहे. योग्य वेळी योग्य निर्णय होईल, असं यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

अल निनोवर प्रतिक्रिया 

दरम्यान यावेळी मान्सूवर अल निनोचं सावट आहे, यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अल निनोचा वर्ष आहे. सरासरी पाऊस जरी 92 टक्के असला तरी मराठवाडा, पश्चिम विदर्भातील काही जिल्हे उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे आवर्षण प्रवण भागात आहेत.  या भागात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना सातत्याने सांगितला जात आहे, काळजी घ्या, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येऊ नये.  कमी पावसातही जास्तीत जास्त नुकसान कसे टाळता येईल? यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात