Rajya Sabha election:हितेंद्र ठाकूर कुणाकडे? बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी शिवसेना-भाजपात रस्सीखेच, काल शिवसेनेचं शिष्ठमंडळ, आज भाजपचे महाजन भेटीला

हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास पक्षाकडे 3 मते आहेत, त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून जास्त जोमाने प्रयत्न करण्यात येत आहेत.

Rajya Sabha election:हितेंद्र ठाकूर कुणाकडे? बहुजन विकास आघाडीच्या पाठिंब्यासाठी शिवसेना-भाजपात रस्सीखेच, काल शिवसेनेचं शिष्ठमंडळ, आज भाजपचे महाजन भेटीला
Mahajan and thakurImage Credit source: TV 9 marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 10:37 PM

मुंबई – राज्यसभा निवडणुकीची (Rajya Sabha election)रंगत शिगेला पोहचलेली आहे. मतदानासाठी अवघे चार दिवस राहिले असल्याने शिवसेना-भाजपा नेत्यांची (Shivsena-BJP)अपक्ष आमदारांचा आणि छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी चांगलीच धडपड सुरु आहे. या निवडमुकीत महत्त्व आल्याने छोट्या पक्षाचे नेते आणि अपक्ष आमदारही त्यांची नाराजी व्यक्त करतायेत, तसेच त्यांच्या मागण्याही मांडत आहे. हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur)यांच्या बहुजन विकास पक्षाकडे 3 मते आहेत, त्यामुळे त्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी शिवसेना आणि भाजपा या दोन्ही पक्षांकडून जास्त जोमाने प्रयत्न करण्यात येत आहेत. यापूर्वी हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामावर नाराजी जाहीर केली होती. त्यानंतर शिवसेनेच्या चार नेत्यांच्या शिष्ठमंडळाने रविवारी त्यांची भेट घेतली होती, त्यानंतर सोमवारी भाजपा नेते गिरीश महाजन हे हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला दाखल झाले.

विरारच्या निवासस्थानी महाजन-ठाकूर भेट

एका अलिशान गाडीतून अतिशय गोपनीय पद्धतीने गिरीश महाजन हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला आले. दोन तासांहून जास्त काळ हितेंद्र ठाकूर आणि महाजन यांची भेट सुरु होती. त्यांनी भाजपाच्या उमेदवाराला मत द्यावे, यासाठी महाजनांनी त्यांचे मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. भाजपाने ही राज्यसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली असून ज्या तीन नेत्यांकडे या निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे, त्यात गिरीश महाजनांचा समावेश आहे. महाजन यांच्याकडे अपक्ष आणि छोट्या पक्षांची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे. त्यामुळे महाजन आणि ठाकूर यांची भेट महत्त्वाची मानली जाते आहे. त्यापूर्वी शनिवारीही भाजपाचे राज्यसभेचे उमेदवार धनंजय महाडीक हेही आले होते. त्यांनी ही ठाकूरांची भेट घेतली होती.

रविवारी 4 तास शिवसेना नेत्यांसमोबत चर्चा

रविवारी शिवसेनेचे शिष्ठमंडळ हितेंद्र ठाकूर यांच्या भएटीला आले होते. यात खासदार राजन विचारे, संजय राऊत यांचे बंधू आणि शिवसेना आमदार सुनील राऊत यांच्यासह अजून दोन नेत्यांचा समावेश होता. सुमारे चार तास हितेंद्र ठाकूर आणि शिवसेना नेत्यांची ही भेट सुरु होती.

हे सुद्धा वाचा

पाठिंब्याबाबत ठाकूर यांचे मात्र मौनच

शिवसेना-भाजपा नेत्यांची भेट झाल्यानंतरही या राज्यसभा निवडणुकीत कुणाला मत देणार याची भूमिका अद्याप पर्यंत हितेंद्र ठाकूर यांनी स्पष्ट केलेली नाही. मतदानाच्या दिवशीच मतदानातून भूमिका स्पष्ट करणार असल्याचं ते सांगातायेत. त्यांच्यासारखीच भूमिका अनेक अपक्ष आणि छोट्या पक्षांनी घेतली आहे. त्यामुळे शिवसेना-भाजपाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत कोम जिंकणार, हे शेवटपर्यंत गुलदस्त्यातच राहील असे सध्यातरी दिसते आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.