AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

….तर कोहळा, आवळा अन् सगळंच भस्मसात होईल; इंधन दरवाढीवरुन सामना अग्रलेखात केंद्रावर टीकेचे आसूड

तेल उत्पादक देशांकडे बोट दाखवून स्वतःची जबाबदारी झटकण्याचे उद्योग सुरू आहेत, असे समाना अग्रलेखात म्हटले आहे. (shiv sena price increase fuel gas cylinder samana editorial)

....तर कोहळा, आवळा अन् सगळंच भस्मसात होईल; इंधन दरवाढीवरुन सामना अग्रलेखात केंद्रावर टीकेचे आसूड
पेट्रोल दरवाढ
| Updated on: Mar 02, 2021 | 6:53 AM
Share

मुंबई : “पेट्रोल दरवाढीची शंभरी आणि गॅसची हजारी करून जनतेकडून कोहळा काढायचा. नंतर थोडय़ा दरकपातीचा आवळा जनतेच्या हातावर टेकवायचा असा प्रकार सुरू आहे. अनिर्बंध इंधन दरवाढीने सामान्य माणसाचे बजेट पूर्णपणे मोडून पडले आहे. ते सावरण्याऐवजी तेल उत्पादक देशांकडे बोट दाखवून स्वतःची जबाबदारी झटकण्याचे उद्योग सुरू आहेत. तुम्ही इंधन-गॅसचे दर कमी करू शकता, ते आधी करा. अन्यथा, उद्या या दरवाढीचा भडका उडेल आणि त्यात कोहळा, आवळा आणि सगळेच भस्म होईल,” असा इशारा शिवसेनेने सामना अग्रलेखातून दिलाय(shiv sena criticizes central government on price increase of fuel and gas cylinder through the samana editorial)

दरवाढ नियंत्रणाचा हा कोणता प्रकार म्हणायचा?

यावेळी शिवसेनेच्या सामना मुखपत्राने इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला घेरले आहे. “पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसचे दर मार्च-एप्रिलमध्ये कमी होतील असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्री म्हणाले. त्यानंतर लगेचच सोमवारी घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 25 रुपयांनी वाढली. जनतेला शाब्दिक दिलासादेखील मिळू द्यायचा नाही असा पणच केंद्र सरकारने केला आहे का? मागील महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरचे दर सुमारे 100 रुपयांनी वाढले. आता मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी त्यात पुन्हा 25 रुपयांची भर पडली. सरकार आता म्हणते, पेट्रोलियम उत्पादक देशांना उत्पादन वाढविण्यास सांगितले आहे. त्यामुळे हिंदुस्थानी जनतेला दरवाढीपासून दिलासा मिळू शकेल. दरवाढ नियंत्रणाचा हा कोणता प्रकार म्हणायचा? तुम्ही सांगितले म्हणजे तेल उत्पादक देश लगेच कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवतील, असे आहे का?” असा सवाल सामना अग्रलेखात करण्यात आला आहे.

…असा काही विचार सरकारचा आहे का?

दरवाढीच्या मुद्द्यावरुन सामनाने केंद्र सरकारवर चांगलीच टीका केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेत्याने देशात थंडी असल्यामुळे इंधन दरवाढ झाली, असे वक्तव्य केले होते. याच वक्तव्याचा आधार घेत सामनाने केंद्र सरकारला घेरले आहे. “तुम्ही दरवाढीला लगाम घालू शकता. मात्र ते करायचे नाही आणि भलतेच सांगून मोकळे व्हायचे. याआधीही ”थंडी होती म्हणून इंधन दरवाढ झाली, आता थंडी कमी झाली असल्याने दरही कमी होतील” असे म्हटले गेले. ही बनवाबनवी करण्यापेक्षा दर नियंत्रण करा. मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांत या किमती किती वाढतील याचा काहीच भरवसा नाही. पेट्रोल-डिझेलच्या दराने आधीच ‘शंभरी’ गाठली आहे. घरगुती गॅसच्या सिलिंडरनेही हजारी गाठावी असा काही विचार सरकारचा आहे का?,” असा सवाल सामनाने केला आहे.

तसेच, “आजच्या दरवाढीने एका एलपीजी गॅस सिलिंडरला सुमारे 820 रुपये मोजावे लागणार आहेत. सरकार म्हणते मार्च-एप्रिलमध्ये हे दर कमी होतील, पण तोपर्यंत ते वाढतच राहतील, त्याचे काय? बरं, पेट्रोल-डिझेल आणि गॅसचे दर कधी कमी होतील याचा काहीच अंदाज देता येणार नाही, असेही सरकारच म्हणते,  असे म्हणत मार्च-एप्रिलमध्ये दर कमी होतील असे फुगे हवेत का सोडत आहात? असा सवालही सामना अग्रलेखातून करण्यात आला आहे.

सरकार शब्दांचे बुडबुडे हवेत सोडतंय

“मुळात खरा प्रश्न पेट्रोल-डिझेल आणि घरगुती गॅसच्या दरात होत असलेल्या अनियंत्रित वाढीचा आहे. या दरवाढीला केंद्र सरकार लगाम का घालत नाही? हा जनतेलाही पडलेला प्रश्न आहे. एप्रिलनंतर दर कमी झाले तरी तोपर्यंत ते भयंकर प्रमाणात वाढलेले असतील. कशासाठी जनतेच्या जिवाशी असा खेळ करीत आहात? कोरोना संकट कोसळल्यापासून आतापर्यंत देशात इंधनाच्या दरात तब्बल 65 टक्के एवढी वाढ झाली आहे. दरवाढीचा हा वेग पाहता एप्रिलपर्यंत ती 100 टक्के वाढीचे वर्तुळ पूर्ण करील असे चित्र आहे. पुन्हा या दरवाढीने जी अप्रत्यक्ष महागाई झाली आहे, त्याचे काय? वाहतुकीच्या खर्चात 40 टक्के, लॉजिस्टिक्सच्या खर्चात 23 टक्के, प्रवास खर्चात, जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत 15 ते 20 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे महागाई आकाशाला भिडली आहे. या गोष्टींना लगाम घालण्याचे सोडून मार्च-एप्रिलमध्ये इंधन दर कमी होतील असे शब्दांचे बुडबुडे सरकार हवेत सोडत आहे,” असा टोलाही सामना अग्रलेखात लावण्यात आला.

शेवटी सामना अग्रलेखात शिवसेनेने इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरुन सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे. “अनिर्बंध इंधन दरवाढीने सामान्य माणसाचे बजेट पूर्णपणे मोडून पडले आहे. ते सावरण्याऐवजी तेल उत्पादक देशांकडे बोट दाखवून स्वतःची जबाबदारी झटकण्याचे उद्योग सुरू आहेत. तुम्ही इंधन-गॅसचे दर कमी करू शकता, ते आधी करा. अन्यथा, उद्या या दरवाढीचा भडका उडेल आणि त्यात कोहळा, आवळा आणि सगळेच भस्म होईल, हे लक्षात ठेवा,” असं सामन अग्रलेखात म्हटंलय.

इतर बातम्या :

वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यानेच पब-बार बिनधास्त सुरु : देवेंद्र फडणवीस

‘चित मैं जिता पट तू हारा’ ही भाजपची भूमिका; विरोधकांच्या ‘त्या’ आरोपानंतर काँग्रेसचा पलटवार

वनमंत्री पदासाठी आता काँग्रेसचं लॉबिंग, मदत आणि पुनर्वसन खातं शिवसेनेला देण्याची तयारी!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.