AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे पक्षप्रमुख पद लागणार?; महत्त्वाच्या बैठकीत काय काय घडलं?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये अनेक ठराव मांडण्यात आले. 

आता एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे पक्षप्रमुख पद लागणार?; महत्त्वाच्या बैठकीत काय काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Jun 30, 2025 | 7:20 PM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये अनेक ठराव मांडण्यात आले.  ज्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव, जातीय जनगणना निर्णयाच्या अभिनंदनाचा ठराव,  मराठी अस्मितेबाबतचा ठराव, भारताची बाजू विदेशात भक्कमपने मांडण्याचा ठराव, पक्षांतर्गत निवडणुकांचा ठराव, निवडणूक जाहीर करण्याचा ठराव,  पक्ष गटाच्या पदाचे पदनाम बदलण्याचा ठराव मांडण्यात आला, तसेच पक्षाचे पुढचे अधिवेशन दिल्लीत घेण्यात यावे या संदर्भात देखील ठराव झाला, यावेळी एकनाथ शिंदे यांनी कार्यकारिणीला मार्गदर्शन केलं.

नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? 

एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, मला कोणतं पद द्यायचं यात पदाधिकाऱ्यांचं एकमत नाही. त्यामुळे आधी पदाधिकाऱ्यांनी एकमत करा, तोपर्यंत माझं मुख्य नेता हेच पद कायम राहील. पदाबाबत पुढच्या बैठकीत निर्णय घेऊ. कार्यकर्ता आणि लाडका भाऊ हेच पद माझ्यासाठी सर्वात मोठं आहे, पदं येतात जातात.  नाव जपलं पाहिजे, मी तेच जपतोय. शिवसेना ‘पक्षप्रमुख’ या पदासाठी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे तर शिवसेना ‘राष्ट्रीयप्रमुख’ असं नाव द्यावं अशीही काही जणांची इच्छा, असल्याचं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आमदार मंत्र्यांना कानपिचक्या 

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आमदार आणि मंत्र्यांना देखील कानपिचक्या दिल्याचं पाहायला मिळालं. कमी बोलू आणि जास्त काम करू तेवढं चांगलं, विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका . तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. आपण एवढं मोठं यश मिळवलं ते चुकीचं बोलून घालवू नका. शिस्तीला तडा जाईल असं काही करू नका . केलेल्या कामांची ब्रेकिंग न्यूज व्हायला पाहिजे. जास्त ऐका कमी बोला, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठीची गळचेपी सहन करणार नाही. मराठी माणसाच्या उध्दारासाठी जे काही करायचं ते आपण करणार. दिलेला शब्द आपण पाळतो त्यामुळे मराठी माणूस आपल्यासोबत आहे. मुंबईबाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणायचा प्रयत्न आपण करतोय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या कार्यकाळात झालाय. मराठी भाषा भवन आपण तयार करतोय, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.