AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जसा आम्ही पक्ष फोडतो, तसे तुम्ही विद्यार्थी फोडा… ‘; गुलाबराव पाटलांनी शिक्षकांना काय दिला सल्ला?

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे सांगताना त्यांनी शिक्षकांना अजब सल्ला दिला आहे.

'जसा आम्ही पक्ष फोडतो, तसे तुम्ही विद्यार्थी फोडा... '; गुलाबराव पाटलांनी शिक्षकांना काय दिला सल्ला?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 12, 2025 | 5:35 PM
Share

शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी हे सांगताना आम्ही ज्या पद्धतीने पक्ष फोडतो, त्या पद्धतीनं तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल आहे. माझ्या आयुष्यात मी बऱ्याच लोकांना त्रास दिला, मात्र मी तात्पुरत्या स्वरूपात बोललो आणि लगेच विसरलो, परंतु मी शिक्षकांना कधीच त्रास दिला नाही, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील? 

जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, हे सांगताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. आम्ही ज्या पद्धतीने पक्ष फोडतो,  त्या पद्धतीने तुम्ही विद्यार्थी फोडले पाहिजे असे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केल आहे. जळगाव ग्रामीण मधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये एकूण ४५ हजार एवढे विद्यार्थी आहेत, त्यामध्ये कुठलीही  वाढ झालेली नाही, यावर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी हे विधान केलं आहे.

माझ्या आयुष्यात मी बऱ्याच लोकांना त्रास दिला, मात्र मी तात्पुरत्या स्वरूपाचा बोललो आणि लगेच विसरलो. मात्र शिक्षकाला मी कधीच त्रास दिला नाही. कारण शिक्षकांबद्दल आमच्या मनामध्ये एक वेगळं स्थान आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण जर मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या जर टिकवू शकलो असतो, तर 50 हजार डीएड झालेले मुलं नोकरीला लागले असते, असंही यावेळी गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. जळगावात मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा संकल्पनेंतर्गत तालुका स्तरावर शाळांना पुरस्कार वितरण सोहळा पार पडला, या सोहळ्यात गुलाबराव पाटील बोलत होते.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी आपल्या वक्तव्यावर सारवासराव देखील केल्याचं पाहायला मिळालं. मी विनोदानं बोललो , जसे आम्ही एकमेकांच्या पक्षातील कार्यकर्ते आमच्या पक्षात घेण्याचा प्रयत्न करतो, तसं शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत करावं, असं मला म्हणायचं होतं. यामध्ये दुसरा चुकीचा भाव नव्हता, पटसंख्या कशी वाढेल हे सांगण्यासाठी तो विनोदाचा भाग होता, असं यावेळी पाटील यांनी म्हटलं.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा