AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठी सक्तीच्या मुद्द्यात संजय निरुपम यांचे थेट विधान, बैठकपूर्वी म्हणाले, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व..

1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यानंतर आता मोठा वाद निर्माण झाला. बरेच रिक्षा आणि टॅक्सीचालक आपल्या गावी परतत आहेत. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी यादरम्यानच अत्यंत मोठे विधान केले.

मराठी सक्तीच्या मुद्द्यात संजय निरुपम यांचे थेट विधान, बैठकपूर्वी म्हणाले, महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व..
Sanjay Nirupam
| Updated on: Apr 27, 2026 | 1:19 PM
Share

1 मे पासून रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, यामध्ये सरकारमध्ये दोन गट बघायला मिळत आहेत. मुंबईतील अमराठी रिक्षा आणि टॅक्सीचालक संतापले आहेत. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी या निर्णयाला विरोध केला. मनसे कार्यकर्त्यांनी संजय निरुपम यांना टार्गेट करत हल्ला केला. या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावध भूमिका घेतली. मराठी भाषा अनिवार्य करण्याबाबत मंत्रालयात आज महत्वपूर्ण बैठक होणार आहे. रिक्षा टॅक्सीचालक संघटनेच्या प्रतिनिधिंसोबत ही बैठक होणार आहे. या बैठकीकडे राज्याच्या नजरा आहेत. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या दालनात ही बैठक होणार आहे. कामगार नेते शशांक राव आणि संजय निरुपम या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होणार आहे. आता नुकताच संजय निरुपम यांनी या बैठकीपूर्वी अत्यंत मोठे विधान केले.

संजय निरुपम यांनी म्हटले की, महाराष्ट्रात मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या सर्व लोकांनी मराठी भाषा बोलली पाहिजे. मराठीमध्ये संवाद केला पाहिजे, यामध्ये काहीही मतभेद नाहीत, काहीही वाद नाही. फक्त जीआरमध्ये एक तरतुद आहे 1 मे पासून प्रत्येक रिक्षाचालक आणि टॅक्सीचालकाने आरटीओमध्ये मराठी भाषेचे जे ज्ञान आहे त्याची तपासणी होईल. मराठी भाषेची त्यांची एक परीक्षा होईल.

समजा त्यामध्ये ते नापास झाले तर.. त्या जीआरमध्ये असे सांगितले गेले की, त्यांचे परमिट रद्द केले जाईल, त्यांचे लायसन्स जप्त होईल आणि जो बॅच असतो तो देखील जप्ती होईल. हा एक मोठ्या वादाचा विषय आहे. मी माझ्या पक्षाचे जे नेते आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना एक पत्र पाठवले आणि सांगितले की, तुम्ही जो मराठी सक्तीचा जो प्रस्ताव ठेवत आहेत तो थोडा अन्यायकारक आहे.

पुढे संजय निरुपम यांनी म्हटले, कारण जे रिक्षाचालक आणि टॅक्सीचालक आहेत, ते सर्व मराठी बोलू शकत नाहीत, असे नाही. खूप सारे मराठी बोलू शकतात. समजा ज्यांना मराठी बोलता येत नाही. समजा तुमच्या परीक्षेत नापास झाले तर त्यांच्या परमिट रद्द करण्याचा जो राज्य शासनाकडून निर्णय घेण्यात आला. त्याच्यामुळे एक दुश्परिणाम होऊ शकतो. लोकांसोबत उपाशी राहण्याचे संकट येऊ शकते.

Follow Us
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठच... गुलाबराव पाटील
कितीही केलं तरी तुम्ही तरुण होणार नाही, ज्येष्ठ... गुलाबराव पाटील अन् महाजनांमध्ये वेगळीचं जुगलबंदी
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला