AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटाच्या या आमदाराचा विजय बोगस मतदारांमुळे, रावसाहेब दानवे यांच्या दाव्याने महाराष्ट्र हादरला

BJP vs Shiv Sena : भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी शिंदे गटाच्या एका आमदाराचा विजय हा बोगस मतदारांमुळे झाल्याचा दावा केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

शिंदे गटाच्या या आमदाराचा विजय बोगस मतदारांमुळे, रावसाहेब दानवे यांच्या दाव्याने महाराष्ट्र हादरला
Raosaheb DanveImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Dec 09, 2025 | 10:24 PM
Share

रामू ढाकणे, प्रतिनिधी :  देशभरातील विरोधी पक्षांनी बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित केला आहे. खासकरून राहुल गांधी अनेकदा सत्ताधारी पक्षांवर मतचोरीचाही आरोप केला आहे. अशातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी शिंदे गटाच्या एका आमदाराचा विजय हा बोगस मतदारांमुळे झाल्याचा दावा केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. विरोधी पक्ष बोगस मतदानाचा मुद्दा उपस्थित करत असताना आता सत्ताधारी पक्षातील नेतेही तीच भाषा वापरू लागले आहेत. रावसाहेब दानवे यांनी कोणत्या आमदारावर हा आरोप केला ते जाणून घेऊयात.

भाजपचा विजय होणार – दानवे

भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेचे सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांचा विजय बोगस मतदारांमुळे झालेला आहे असा दावा केला आहे. ‘स्थानिक स्वराज्य संस्थांचा निकाल भाजपच्या बाजूने लागेल, परंतु ज्या ठिकाणी सामाजिक समीकरण बिघडलेले आहे त्या ठिकाणचा निकालाची आम्ही खात्री देऊ शकत नाही असं रावसाहेब दानवे यांनी म्हटले आहे.

अब्दुल सत्तार यांचा विजय बोगस मतदारांमुळे झाला – दानवे

पुढे बोलताना दानवे यांनी, मी बोगस मतदारांचा पुरावा दिलेला आहे, नाव एकाच फोटो दुसऱ्याचा. भोकरदन मधील 3 हजार 200 नाव सिल्लोडमध्ये आहेत आणि ते मी निवडणूक आयोगाला देणार आहे. बाहेरून मतदार घेऊन आणि त्यांचं मतदान डबल टिबल करून जिंकणं यात काही फार शौर्य नाही. विधानसभेला सुद्धा तेच झालं आणि 100% अब्दुल सत्तारांचा विजय हा बोगस मतदारांमुळे झालेला आहे असा दावा केला आहे.

काँग्रेस नेत्यांचा लोकशाहीवर विश्वास नाही – दानवे

काँग्रेस नेत्यांनी बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यावर बोलताना दानवे यांनी म्हटले की, ‘त्यांचा लोकशाहीवर कुठे भरोसा आहे आणि ते कुठे लोकशाही मानतात? त्यांनी जर लोकशाही मानली असती तर विरोधी पक्षाच्या लोकांना आणीबाणी मध्ये जेलमध्ये टाकलं नसतं. यांचा सरकारवर भरोसा नाही, निवडणूक आयुक्तावर भरोसा नाही, जनतेवर भरोसा नाही. यांनी मत चोरीचा मुद्दा घेऊन बिहारची निवडणूक लढवली तर तिथल्या जनतेने यांना उत्तर दिलेले आहे. शेवटी असं होईल राहुल गांधी जर व चोरीचा मुद्दा नेहमी उपस्थित करतात आणि नेहमी हरत आहेत. त्यामुळे त्यांचे जे मित्र आहेत ते सुद्धा यांच्याबरोबर राहणार नाहीत.

अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया
अजित पवारांच्या मृत्यूवर संजय राऊतांची मोठी प्रतिक्रिया.
अजित पवार यांचा मृत्यू; हसन मुश्रीफ धाय मोकलून रडले!
अजित पवार यांचा मृत्यू; हसन मुश्रीफ धाय मोकलून रडले!.
अजित पवारांचा हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर
अजित पवारांचा हादरवणारा शेवट! अपघातानंतरचे भीषण व्हिडीओ आले समोर.
भीषण विमान अपघातात अजित पवारांचा चटका लावणारा मृत्यू
भीषण विमान अपघातात अजित पवारांचा चटका लावणारा मृत्यू.
मोठी दुर्घटना! महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू
मोठी दुर्घटना! महाराष्ट्र हादरला; विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू.
लॅंडींगदरम्यान बिघाड, धुराचे लोट अन्..; अपघातात अजित पवार गंभीर जखमी
लॅंडींगदरम्यान बिघाड, धुराचे लोट अन्..; अपघातात अजित पवार गंभीर जखमी.
अजित पवारांच्या विमानाचा अपघात; बारामतीत लॅंडींगदरम्यान घडली दुर्घटना
अजित पवारांच्या विमानाचा अपघात; बारामतीत लॅंडींगदरम्यान घडली दुर्घटना.
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय
अंजली भारतींना वादग्रस्त वक्तव्य भोवलं महिला आयोगाने घेतला मोठा निर्णय.
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन...
पद्मभूषण : विरोधकांची कोश्यारींवर टीका, पण मुख्यमंत्र्यांचे समर्थन....
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश
समृद्धी महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करा, मुख्यमंत्र्यांचे आदेश.