AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हा चौकीदार चोर नाही ! राहुल गांधींचे अभिनंदन करतानाच ‘सामना’तून मोदींना इशारा

देशाची हवा बदलली आहे. लोकशाहीचा नवा चौकीदार लोकसभेत रुजू झाला आहे.लोकसभेत आता टोकदार प्रश्न विचारणारा विरोधी पक्षनेता मिळाला आहे. संसद सुरू असताना पंतप्रधान मोदी यांना आता विदेश पर्यटन करता येणार नाही. कारण त्यांचा कर्दनकाळ राहुल गांधी त्या वेळी संसदेत बसलेला असेल. विरोधी पक्षनेते बनल्याबद्दल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना' मधून राहुल गांधी यांचे अभिनंदन करण्यात आले.

हा चौकीदार चोर नाही ! राहुल गांधींचे अभिनंदन करतानाच 'सामना'तून मोदींना इशारा
| Updated on: Jun 27, 2024 | 8:02 AM
Share

देशाची हवा बदलली आहे. लोकशाहीचा नवा चौकीदार लोकसभेत रुजू झाला आहे.लोकसभेत आता टोकदार प्रश्न विचारणारा विरोधी पक्षनेता मिळाला आहे. संसद सुरू असताना पंतप्रधान मोदी यांना आता विदेश पर्यटन करता येणार नाही. कारण त्यांचा कर्दनकाळ राहुल गांधी त्या वेळी संसदेत बसलेला असेल. विरोधी पक्षनेते बनल्याबद्दल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून राहुल गांधी यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत त्यांना इशाराही देण्यात आला आहे. लोकसभेच्या मंचावर आता ही चर्चा घडेल व जग टाळय़ा वाजवील. राहुल गांधी यांना शिष्टाचाराचे ‘राम राम’ करूनच पंतप्रधान मोदी यांना आसनस्थ व्हावे लागेल. संसदेत ‘मोदी मोदी’चे फालतू नारेही बंद होतील. देशाची हवा बदलली आहे, असेही या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

काय म्हटले आहे सामनाच्या अग्रलेखात

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचे नेतृत्व सिद्ध केले आहे. विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सामनातून राहुल गांधी यांचे अभिनंदन करत त्यांचे कौतुक करण्यात आले आहे. तसेच नरेंद्र मोदी , अमित शाह यांना इशाराही देण्यात आला आहे. मोदी आणि त्यांच्या गुजरात ईस्ट इंडिया कंपनीस नव्याने चोऱ्यामाऱ्या करता येणार नाहीत, राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले असून पंतप्रधान मोदी यांची अवस्था कठीण होणार आहे अशा शब्दांत या अग्रलेखातून सुनावण्यात आलं आहे.

सामनाचा अग्रलेख जसाच्या तसा..

राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत त्यांचे नेतृत्व सिद्ध केले आहे. फॅसिस्ट प्रवृत्तीच्या नरेंद्र मोदी यांच्यावर बहुमत गमावण्याची वेळ राहुल गांधींमुळेच आली. भारतीय राजकारणाचे खरे जननायक म्हणून ते पुढे आले. दोन ‘भारत जोडो’ यात्रांमुळे त्यांना संपूर्ण देशाचे पायी भ्रमण करून जनतेचे व देशाचे प्रश्न समजून घेता आले. 2024 ची निवडणूक हेराफेरी व हातचलाखी करून मोदी आणि त्यांच्या गुजरात ईस्ट इंडिया कंपनीने खिशात घातली, पण आता राहुल गांधी हे लोकसभेतील विरोधी पक्षनेते झाले असून पंतप्रधान मोदी यांची अवस्था कठीण होणार आहे. एकतर मोदी यांना स्क्रिप्ट व टेलिप्रॉम्पटरशिवाय धड बोलता येत नाही. प्रश्नापासून पळ काढण्याची त्यांची वृत्ती आहे. संसदेच्या सभागृहात त्यांचे बूड टिकत नाही. कारण गेली दहा वर्षे लोकसभेत विरोधी पक्षनेता असा नव्हताच. गुजरातची धर्मशाळा असल्याप्रमाणे मोदी-शहा हे लोकसभा चालवत होते. आता मोदी यांनी कितीही ठरवले तरी त्यांना लोकसभेतून पळता येणार नाही.

हा चौकीदार चोर नाही

लोकशाही, संविधान व लोकसभेचा चौकीदार म्हणून राहुल गांधी यांनी विरोधी पक्षनेत्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मुख्य म्हणजे हा चौकीदार चोर नाही. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत झालेल्या देशातील चोऱ्यांचा हिशेब सरकारला संसदेत द्यावा लागेल व मोदी आणि त्यांच्या गुजरात ईस्ट इंडिया कंपनीस नव्याने चोऱ्यामाऱ्या करता येणार नाहीत. यापुढे मोदी-शहांची अवस्था ‘सरकार नको, पण राहुल गांधींना आवरा’ अशीच होईल. देशवासीयांना राहुल गांधींकडून तीच अपेक्षा आहे. मोदी यांनी स्वतःचे बहुमत गमावले आहे. नायडू, नितीश, चिराग पासवान वगैरे लोकांच्या पाठिंब्यावर ते सरकार चालवत आहेत. त्यामुळे मोदी-शहांच्या चोऱ्या, दरोडय़ांचा हिशेब त्यांच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्यांकडेही मागितला जाईल.

मोदी-शहांचा खोटारडेपणा व क्रौर्य यांचा समाचार घेण्याची ताकद राहुल गांधीमध्ये

निवडणुकांच्या दरम्यान राहुल गांधी यांनी मोदी यांच्या अनेक फसव्या योजनांवर प्रहार केले. अग्निवीर, जातीय जनगणना, बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार, भाजपच्या संविधानविरोधी कृतीवर प्रहार केले. निवडणुकीची दिशा व हवा बदलण्याचे काम या निवडणुकीत राहुल गांधी यांनी केले. मणिपूर जळत असताना मोदी यांनी पंतप्रधान म्हणून त्यांचे कर्तव्य बजावले नाही, पण राहुल गांधी हे बेडरपणे मणिपुरात गेले व लोकांना भेटले. या सगळय़ाचा परिणाम झाला व मोदी यांचा मुखवटाच गळून पडला. राहुल गांधी हे गांभीर्याने राजकारण करीत नाहीत, परिवारवादामुळे ते नेते आहेत असा आरोप त्यांच्यावर झाला, पण ‘भारत जोडो’ यात्रेने एक प्रगल्भ नेतृत्व म्हणून त्यांनी स्वतःची ओळख करून दिली. मोदी यांच्या हुकूमशाहीचा आपण पराभव करू शकतो हा आत्मविश्वास त्यांनी लोकांत निर्माण केला व आता विरोधी पक्षनेतेपद स्वीकारून आपण गांभीर्यपूर्वक राजकारण करीत आहोत हे दाखवून दिले. मोदी-शहांचे राजकारण हे भ्रष्टाचारातून निर्माण झालेल्या पैशांचे बुडबुडे आहेत. हे बुडबुडे फुटायला आता सुरुवात होईल. मोदी-शहांचा खोटारडेपणा व क्रौर्य यांचा समाचार घेण्याची ताकद राहुल गांधी यांच्या प्रामाणिकपणात आहे.

विरोधी पक्षनेता हा देशातील जनतेचा खरा बुलंद आवाज

सरकारच्या अनेक नेमणुकांसाठी एक केंद्रीय समिती असते. त्यात पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्यांचा समावेश असतो. निवडणूक आयोग, लोकपाल, सीव्हीसी, सीबीआय, ईडी प्रमुखपदी सध्या भाजपचे ‘घरगडी’ नेमले जातात. आता राहुल गांधी यांचे मत व आवाज तेथे असेल. विरोधकांचा सन्मान राखणे ही भारतीय लोकशाहीची परंपरा आहे. पंडित नेहरूंपासून अटल बिहारी वाजपेयींपर्यंत सगळय़ांनीच या परंपरेचे पालन केले. विरोधी पक्षनेत्यांचे भाषण सुरू असताना नेहरू संसदेत थांबत. कारण विरोधी पक्षनेता हा देशातील जनतेचा खरा बुलंद आवाज आहे. सरकारच्या चुका दाखविण्याचे काम विरोधी पक्षनेता करतो व तीच टीका मार्गदर्शन म्हणून स्वीकारून पुढे जाणारा पंतप्रधान खरा लोकनायक बनतो.

मोदी हे नेमके या परंपरेच्या उलट वागले. मोदी-शहांच्या गुजरात ईस्ट इंडिया कंपनीने लोकसभा वेठीस धरली व या कृतीस काही जणांनी चाणक्य नीतीची उपमा दिली. देशाची न्यायालये, मीडिया आज गुदमरलेले आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजे गुजरात ईस्ट इंडिया कंपनीच्या भाडोत्री मारेकऱ्यांच्या टोळय़ांप्रमाणे काम करीत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मिळालेला जामीन हायकोर्टाने रद्द केला तो याच टोळय़ांच्या दहशतीमुळे. देशभरात मांडलेला हा उच्छाद भयंकर आहे. नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू यांना अशा प्रकारे देश चालवणे मान्य आहे काय ? लोकसभेत आता टोकदार प्रश्न विचारणारा विरोधी पक्षनेता मिळाला आहे. संसद सुरू असताना पंतप्रधान मोदी यांना विदेश पर्यटन करता येणार नाही. कारण त्यांचा कर्दनकाळ राहुल गांधी त्या वेळी संसदेत बसलेला असेल. राहुल गांधी यांनी मोदी यांना अनेक विषयांवर खुल्या मंचावरील चर्चेचे आव्हान दिले व मोदी यांनी पळ काढला. लोकसभेच्या मंचावर आता ही चर्चा घडेल व जग टाळय़ा वाजवील. राहुल गांधी यांना शिष्टाचाराचे ‘राम राम’ करूनच पंतप्रधान मोदी यांना आसनस्थ व्हावे लागेल. संसदेत ‘मोदी मोदी’चे फालतू नारेही बंद होतील. देशाची हवा बदलली आहे. लोकशाहीचा नवा चौकीदार लोकसभेत रुजू झाला आहे. राहुल गांधी यांचे अभिनंदन!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.