Video: आधी त्यानं फुकटात पेट्रोल भरलं, कानशिलातही लगावली, नंतर पोलीस ठाण्यात शिवाीगाळ, बीडात सेना कार्यकर्त्याची गुंडगिरी

मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी बीडमध्ये चांगलाच गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

Video: आधी त्यानं फुकटात पेट्रोल भरलं, कानशिलातही लगावली, नंतर पोलीस ठाण्यात शिवाीगाळ, बीडात सेना कार्यकर्त्याची गुंडगिरी
Follow us
| Updated on: Mar 15, 2021 | 5:06 PM

बीड : मद्यधुंद अवस्थेत असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांनी बीडमध्ये चांगलाच गोंधळ घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या मुजोर शिवसेना कार्यकर्त्यांनी डिझेल भरल्यानंतर पैसे न देता विचारणा करणाऱ्या मॅनेजरच्या थेट कानशिलात लागवली. हा मारहाणीचा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे (Shivsena Activist beat Petrol pump employee after asking for payment in Beed).

शिवसेनेच्या मद्यधुंद कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत मारहाण केल्यानंतर पंप कर्मचाऱ्यांनी पोलिसांशी संपर्क केला. पोलिसांनी मद्यधुंद असलेल्या शिवसेना कार्यकर्त्यांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणले. मात्र, या कार्यकर्त्यांचा मुजोरपणा तरीही थांबला नाही. त्या कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशनमध्येही जालिंदर बनसोडे या पोलीस कर्मचाऱ्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत मारहाण केली. शिवीगाळ करत असताना पोलीस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याने ही घटना मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलीय.

पोलिसांना मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल करुन अटक

या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्याच्या फिर्यादीवरून शिवसेना कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना अटक करण्यात आली आहे. संदीपान बडगे आणि अभिषेक पवळ असं या मद्यपी शिवसेना कार्यकर्त्यांची नावे आहेत. राजकीय कार्यकर्त्यांच्या या अशा मुजोर वर्तणुकीवर नागरिकांनीही चांगलीच नाराजी व्यक्त केलीय.

संबंधित व्हिडीओ पाहा :

हेही वाचा :

बलात्काराच्या आरोपीला 20 वर्ष कारावास, पोलिसांनी नराधमाला कोर्टातून दारु पार्टीला नेलं

जावयाची सासऱ्याच्या फ्लॅटवर नजर, 10 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेला अमानुष मारहाण, तक्रारदार पीडितेला पोलिसांनी हाकललं

सहकारी महिलेला अश्लील व्हिडीओ पाठवणं महागात, रंगेल प्राध्यापकाला पाच वर्षांचा कारावास

व्हिडीओ पाहा :

Shivsena Activist beat Petrol pump employee after asking for payment in Beed

Non Stop LIVE Update
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.