जावयाची सासऱ्याच्या फ्लॅटवर नजर, 10 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेला अमानुष मारहाण, तक्रारदार पीडितेला पोलिसांनी हाकललं

गावाकडील फ्लॅट विकून 10 लाख रुपये आणून दे म्हणून मुंबईच्या जावयाने विवाहितेला अमानुष मारहाण केल्याच्या घटनेने बीड हादरले आहे. | Husband wife beaten

जावयाची सासऱ्याच्या फ्लॅटवर नजर, 10 लाखांच्या मागणीसाठी विवाहितेला अमानुष मारहाण, तक्रारदार पीडितेला पोलिसांनी हाकललं
Dindrood Police Station
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 10:59 AM

बीड : गावाकडील फ्लॅट विकून 10 लाख रुपये आणून दे म्हणून मुंबईच्या जावयाने विवाहितेला अमानुष मारहाण केल्याच्या घटनेने बीड हादरले आहे. याप्रकरणी मुंबईच्या उल्हासनगरमध्ये राहणारा जावई गणेश बोबडेसह चार जणांवर कौटुंबिक हिंसाचार कायद्याअन्वये दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (beed Husband wife beaten for Rs 10 lakh The complainant victim was chased away by the police)

पीडित महिला तीन महिन्यांची गर्भवती आहे. 10 लाख रुपये दे तरच हा गर्भ स्वीकारेन अशी धमकी पतीने दिल्याने पीडित महिला भेदरली आहे. या प्रकरणात दाद मागण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या पीडितेला पोलिसांनी अक्षरशः हाकलून दिल्याने पीडितेने पोलीस अधिक्षकांकडे धाव घेत न्याय मागितला आहे.

नेमका काय प्रकार?

माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथील मीना हिचा विवाह मुंबईच्या उल्हासनगर येथील गणेश बोबडे याच्यासोबत झाला होता. लग्नाला केवळ 8 महिने झाले असतानाच जावई गणेश याची नजर सासऱ्याच्या संपत्तीवर पडली. गावातील फ्लॅट विकून दहा लाख रुपये आणून देण्यासाठी गणेश आणि त्याचे आई वडील सतत तगादा लावत होते. शिवाय अमानुष मारहाण देखील करायचे. यात पीडित मीना ही गर्भवती राहिली. हा गर्भ स्वीकारण्यासाठी दहा लाख रुपये आणून दे असं म्हणत पती आणि सासरकडील मंडळीने पीडितेला डांबून ठेवून अमानुष मारहाण केली.

 तक्रारदार पीडितेला पोलिसांनी हाकललं, पोलिसांच्या दारी न्यायासाठी परवड

प्रकृती खराब झाल्याने तिला बेशुद्ध अवस्थेत माहेरी आणून सोडले. यावेळी पीडितेच्या घरच्यांनी जाब विचारला असता त्यांनाही मारहाण करून पसार झाले. याप्रकरणी दाद मागण्यासाठी पीडित आणि तिचे कुटुंब दिंद्रुड पोलीस ठाण्यात धाव घेतली. इथेही पोलिसांनी अनेक तास ताटकळत ठेवत केवळ कौटुंबिक हिंसाचार अन्वये तक्रार घेऊन चौकशीवर ठेवले. शिवाय पीडितेला पोलीस ठाण्यातूनच हाकलून दिले.

न्याय मिळावा म्हणून पीडितेने पोलीस अधीक्षक आर राजा यांच्याकडे धाव घेऊन पोलिसांनी केलेल्या प्रकाराची तक्रार दिली आहे. या प्रकरणात सासारकडील मंडळीवर मात्र अद्याप कारवाई झालेली नाही.

(beed Husband wife beaten for Rs 10 lakh The complainant victim was chased away by the police)

हे ही वाचा :

पतीनिधनानंतर शेजाऱ्याशी सूत जुळले, लग्नाला विरोधाची भीती, महिलेची प्रियकरासह आत्महत्या

दोघा प्रवाशांना रिंग रोडला नेलं, संध्याकाळी रिक्षाचालकाचा मृतदेह आढळला, नागपुरात खळबळ

आधी तिनं नवऱ्याला पॉर्न व्हिडीओ दाखवले, नंतर खुर्चीला बांधलं आणि पुढं जे केलं त्यानं महाराष्ट्र हादरला !

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.