AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shrikant Shinde : मोदींच्या मंत्रिमंडळात तुम्ही मंत्रि‍पदाची शपथ घेणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर श्रीकांत शिंदेंनी चटकन दिलं असं उत्तर

Shrikant Shinde : श्रीकांत शिंदे यांचे सातत्याने राज्यभर दौरे सुरु असतात. मागच्या 12 वर्षांपासून ते खासदार आहेत. शिवसेनेची कमान एकनाथ शिंदे यांच्या हाती आल्यापासून श्रीकांत शिंदे प्रचंड सक्रीय झाले आहेत.

Shrikant Shinde : मोदींच्या मंत्रिमंडळात तुम्ही मंत्रि‍पदाची शपथ घेणार, या पत्रकारांच्या प्रश्नावर श्रीकांत शिंदेंनी चटकन दिलं असं उत्तर
Eknath Shinde-Shrikant Shinde
| Updated on: Jul 01, 2026 | 12:11 PM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे आज नांदेड दौऱ्यावर आहेत. केंद्रात नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा येत्या दोन दिवसात विस्तार होणार अशी चर्चा आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून मंत्रि‍पदासाठी दोन नावं आहेत. एक म्हणजे श्रीकांत शिंदे आणि दुसरं नाव ओमराजे निंबाळकर. आज श्रीकांत शिंदे नांदेड दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी त्यांना पत्रकारांनी मंत्रि‍पदाबद्दल प्रश्न विचारला. तुम्ही केंद्रीय मंत्री पदाची शपथ घेणार आहात, यावर त्यांनी ‘कोण म्हणालं असा प्रतिप्रश्न केला. सूत्र नाही, तुम्हीच चालवत आहात’ असं श्रीकांत शिंदे म्हणाले. तोकडी कर्जमाफी दिली असं विरोधक बोलतात, आरोप करणं हे विरोधकांच कामच आहे असं उत्तर खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिलं.

पक्ष विस्तार आणि संघटनात्मक बांधणीसाठी श्रीकांत शिंदे यांचे सातत्याने राज्यभर दौरे सुरु असतात. मागच्या 12 वर्षांपासून ते खासदार आहेत. शिवसेनेची कमान एकनाथ शिंदे यांच्या हाती आल्यापासून श्रीकांत शिंदे प्रचंड सक्रीय झाले आहेत. ठाकरे गटाचे 6 खासदार फोडणाऱ्या ऑपरेशन टायगरमध्ये सुद्धा श्रीकांत शिंदे यांची महत्वाची भूमिका होती. संजय राऊत आज त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, श्रीकांत शिंदेंची डॉक्टरकी संशयाची म्हणून ठाकरेंनी त्यांना खासदार केलं, त्यावर राऊतांनी डिग्री तपासून घ्यावी असं उत्तर दिलं.

सरकार शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत राहणार

कर्जमाफीसाठी रोहित पवार मुख्यमंत्र्यांना भेटणार यावर सुद्धा ते बोलले. “ज्यावेळी शेतकऱ्यांना काही सुविधा द्यायच्या होत्या. त्यावेळी आघाडी सरकारने दिल्या नाहीत, युती सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सर्व योजना आणि कर्जमाफी देण्याचं काम झालेलं आहे आणि यापुढे सुद्धा सरकार शेतकऱ्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करत राहणार” असं श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं.

आठ दिवसात दुसरा धक्का

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने कालच उद्धव ठाकरे गटाला पुन्हा एकदा झटका दिला. आठ दिवसात हा दुसरा धक्का होता. आधी सहा खासदार फुटले. काल सचिन अहिर यांच्या रुपाने मातोश्रीच्या निकटवर्तीय असलेला आमदार फुटला. सचिन अहिर यांना विधान परिषदेचं उपसभापतीपद देण्यात आलं.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...