शिवसेनेचा गुजराती बांधवांचा मेळावा स्थगित

शिवसेनेचा गुजराती बांधवांचा मेळावा आणि लोकप्रिय 'डायरो' हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असल्याची माहिती हेमराज शाह यांनी दिली आहे (Shivsena Gujarati Programme Postpone )

शिवसेनेचा गुजराती बांधवांचा मेळावा स्थगित
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 1:28 PM

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिवसेनेचा ‘डायरो’ आणि गुजराती बांधवांचा मेळावा स्थगित करण्यात आला आहे. कोरोनामुक्तीसाठी शासकीय यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. शिवसेनेच्या गुजराती विभागातर्फे मुंबईमध्ये ‘जलेबी फाफडा, उद्धव ठाकरे आपणा’ ही घोषणा देत एकापाठोपाठ एक असे दोन मेळावे प्रचंड प्रमाणात यशस्वी झाले. पहिला जलेबी फाफडा, दुसरा रासगरबा कमालीचा यशस्वी झाला. रविवार, 21 फेब्रुवारी 2021 रोजी ‘डायरो’ हा लोकप्रिय कार्यक्रम शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांनी आयोजित केला होता. (Shivsena Gujarati Programme Postpone Due to Corona outbreak)

सर्व तयारी पूर्ण झाली होती. परंतु गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. मुंबई आणि परिसरात या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. महाविकास आघाडी सरकारने यावर नियंत्रण आणण्यासाठी पराकोटीचे प्रयत्न सुरु केले आहेत. नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे शिवसेनेचा गुजराती बांधवांचा मेळावा आणि लोकप्रिय ‘डायरो’ हा कार्यक्रम स्थगित करण्यात आला असल्याची माहिती हेमराज शाह यांनी दिली आहे. मुंबईमधील परिस्थिती निवळल्यानंतर हा कार्यक्रम दणदणीतपणे आयोजित करण्यात येईल, असेही हेमराज शाह यांनी आवर्जून नमूद केले आहे.

‘एक वचन, तीन नियम’

‘एक वचन, तीन नियम’ या अंतर्गत मास्क च्या वापराची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, हात स्वच्छ धुवावेत आणि सामाजिक अंतर योग्य पद्धतीने राखण्यात यावे, असे कळकळीचे आवाहन करुन हेमराज शाहांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, विनाकारण कुठेही गर्दी करु नका, विशेषतः वरिष्ठ नागरिक आणि दहा वर्षाखालील मुलांना घराबाहेर पाठवू नका, असेही स्पष्ट केले आहे.

कोरोनाची तिसरी लाट थोपवण्यासाठी राज्य सरकार, मुंबई महानगरपालिका आणि यंत्रणेला सर्वतोपरी सहकार्य करावे, अशीही विनंती हेमराज शाह यांनी केली आहे.

‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’

मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर असलेल्या गुजराती मतदारांना आकर्षिक करण्यासाठी शिवसेनेने मुंबईत ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ अशी घोषणा देत जिलेबी, फाफडा आणि वडापावचा मुंबईत बेत आखला होता. या कार्यक्रमाला गुजराती बांधवांना बोलवण्यात आलं होतं. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह आणि कल्पेश मेहता यांच्या नेतृत्वात या भोजन समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्याला गुजराती बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला होता.

संबंधित बातम्या :

‘जिलेबी-फाफडा डिप्लोमसी’ सक्सेस, आता ‘रासगरबा’; 21 गुजराती उद्योगपतींचा रविवारी शिवसेनेत प्रवेश!

‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’; मुंबई जिंकण्यासाठी शिवसेनेची गुजराती मतदारांना साद

(Shivsena Gujarati Programme Postpone Due to Corona outbreak)

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.