मनसेचे अविनाश जाधव ठाण्याच्या पालिकेत जाताच वातावरण तापलं… थेट आयुक्तांसमोरच… नेमकं काय घडलं?
Thane Shivsena MNS Protest: ठाण्यात आज शिवसेना आणि मनसेच्या वतीने विविध मुद्यांबाबत मोर्चा काढण्यात आला होता. आज शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिष्टमंडळ ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी वातावरण तापले होते.

ठाण्यात आज शिवसेना आणि मनसेच्या वतीने विविध मुद्यांबाबत मोर्चा काढण्यात आला होता. ठाण्यात भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात आहे, याची चौकशी व्हावी हा यातील एक प्रमुख मुद्दा होता. आज शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शिष्टमंडळ ठाणे पालिकेच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी वातावरण तापले होते. आज ठाणे महानगर पालिकेत नेमकं काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊयात.
ठाणे महापालिकेमध्ये सचिन बोरसे हे अधिकारी भ्रष्टाचारी असल्याचा आरोप आज मोर्चाच्या शिष्ट मंडळाने महापालिका आयुक्त यांच्या कडे केला. य़ावेळी आयुक्त सौरव राव यांनी अधिकारी सचिन बोरसे यांची बदली करतो असे आश्वासन दिले. याआधी मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाणे महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांना विरोध केला. माळवी अविनाश जाधवांना आयुक्तांच्या केबिन मध्ये घेऊन जात होते. मात्र अविनाश जाधवांनी कडाडून विरोध केला. तुम्ही असाल तर आम्ही आत जाणार नाही असं जाधव यांनी म्हटलं, त्यामुळे वातावरण तापलं होतं.
यावेळी बोलताना मनसे नेते अभिजीत पानसे म्हणाले की, ‘ठाणे म्हणजे बजबज पुरी. भाजप आमदार संजय केळकर देखील आवाज उचलत आहेत. टेंडर निघत आहे मात्र मिली भगत आहे. कमकुवत राजकारण झाले आहे. बाळासाहेब आणि दिघे साहेबाचे फोटो लावायचा, मात्र भ्रष्टाचार सुरू आहे. भिवंडी नाशिक रोडवर वाहतूक कोंडी का होते. ब्रीजचे काम अर्धवट आहे. टेंडर काढत असताना पहिले पैसे बघतात.आम्हाला पालिका वाचवायची आहे. यासाठी ठाणेकरांना एकत्र यावे लागणार.’
पिक्चर अभी बाकी – आव्हाड
आपल्या भाषणात जितेंद्र आव्हाड म्हणाले की, ‘सर्व एकत्र कसे आले, दरोडेखोरांना पकडायला जसं गाव एकत्र येतं तसं आम्ही एकत्र आलो.या ठाण्यात गब्बर सिंग कोण? चुकलेल्या धोरणा मुळे ठाण्याची वाट लावली आहे. ठाण्यात म्हाडाच्या इमारतींमध्ये कोण राहत आहे? प्रकल्प बाधित लोकांना घरे नाहीत. संजय केळकर प्रामाणिक माणूस आहे. सत्तेत बसून कसे मोर्चे काढत आहे. मुख्यमंत्री यांना ठाण्यात लक्ष घालायचे नाही. आम्हाला ठाणेकरांच्या हितासाठी महापालिका वाचवावी लागेल. आता हा ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे.’
