“शिंदे उद्या राष्ट्रपती पदही मागतील, पण दिल्लीने डोळे वटारले की…”, संजय राऊतांचा टोला

एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रि‍पदाची मागणी केली आहे. मात्र याला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून स्पष्ट नकार देण्यात आला आहे. आता यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच या मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. 

शिंदे उद्या राष्ट्रपती पदही मागतील, पण दिल्लीने डोळे वटारले की..., संजय राऊतांचा टोला
एकनाथ शिंदे, संजय राऊत Image Credit source: ANI
Follow us
| Updated on: Nov 29, 2024 | 10:36 AM

Sanjay Raut On Eknath shinde : महाराष्ट्रात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या मुंबईसह दिल्लीत महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेवर विविध बैठका, चर्चासत्र रंगताना दिसत आहेत. त्यातच काल झालेल्या दिल्लीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. तर दुसरीकडे याच बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासह तब्बल १२ मंत्रि‍पदाची मागणी केली आहे. मात्र याला भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडून स्पष्ट नकार देण्यात आला आहे. आता यावरुन राजकीय वातावरण तापलं आहे. त्यातच या मुद्द्यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना एकनाथ शिंदेंच्या गृहमंत्रिपदाच्या मागणीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंना जबरदस्त टोला लगावला. “एकनाथ शिंदे, अजित पवार यांना जे हवंय ते त्यांना कधीच मिळणार नाही. अजित पवार, एकनाथ शिंदे यांचा स्वाभिमान राहिलेला नाही. त्यांनी शरणागती घेतली”, असे संजय राऊत म्हणाले.

“महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांच्यासमोर मान झुकवून उभं”

“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असावं, महाराष्ट्रातील प्रशासन कसं असावं, पोलीस महासंचालक कोण असावं, मुंबई पोलीस आयुक्त कोणं असाव, महाराष्ट्राच्या कोणत्या नेत्याकडे कोणती खाती असावीत, महाराष्ट्रातील कोणता व्यापार कोणी करावा हे सर्व मोदी शाह दिल्लीतून ठरवतात. आमच्या महाराष्ट्राचे नेतृत्व त्यांच्यासमोर मान झुकवून उभं आहे आणि जी हुजर करत आहेत”, असे संजय राऊतांनी म्हटले.

“पदांचं वाटप कसं करावं हा त्यांचा अंतर्गत प्रश्न”

“महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जर महाराष्ट्रात ठरवला जात नसेल तर महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमानाच्या गोष्टी या सरकारने करु नये. सध्या ते तीन पक्ष एकत्र आहेत. त्यांच्या पक्षाला ५० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. अजित पवारांना ४० पेक्षा जागा मिळाल्या आहेत. भाजपला १३० पेक्षा जास्त जागा मिळाल्या. पदांचं वाटप कसं करावं हा त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

“महाराष्ट्र कमजोर करून झालेला आहे”

“एकनाथ शिंदे हे उद्या संरक्षण मंत्रीपदही मागू शकतात. ते उद्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती पद मागू शकतात. माणसं चर्चेत काहीही मागू शकतात. त्यांचं काही मनावर घेऊ नका. एकदा दिल्लीने डोळे वटारले की त्यांना गप्प बसावं लागतं. अजित पवार, एकनाथ शिंदे यांचा स्वाभिमान राहिलेला नाही. त्यांनी शरणागती घेतली. त्यांना जे हवंय ते ते मागतील आणि नाही मिळालं तर सरकारमध्ये पडून राहतील. एकनाथ शिंदे, अजित पवार यांना जे हवंय ते त्यांना कधीच मिळणार नाही. भाजपला जे काम करून घ्यायचं होतं ते झालेलं आहे. महाराष्ट्र कमजोर करून झालेला आहे. जर उद्या भविष्यात यांचे पक्ष फुटले तर आश्चर्य वाटू नये”, असेही संजय राऊत म्हणाले.

राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले
राज्यसभेत काँग्रेस MPच्या बाकाखाली नोटाचं बंडल? सिंघवींनी आरोप फेटाळले.
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?
विधानसभा अध्यक्ष म्हणून नार्वेकरांना पुन्हा संधी मिळणार की पत्ता कट?.
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?
एकनाथ शिंदेंकडून उद्धव ठाकरेंच्या FBला फॉलो, राजकीय वर्तुळात काय घडतय?.
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी
फडणवीस CM होताच सुप्रिया सुळेंनी 'लाडक्या बहिणीं'साठी केली मोठी मागणी.
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले
'तिघांना शुभेच्छा पण आता नाटकबाजी बंद..', शपथविधी होताच जरांगे पेटले.
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले
'शपथविधीला निमंत्रण दिल पण..', 'त्यांच्या' अनुपस्थितीवर फडणवीस म्हणाले.
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ
महायुती आणि मविआतील दोन नेत्यांची गळाभेट... पुढे काय झालं बघा व्हिडीओ.
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?
'कुठं गटाराचं नाव घेताय', चित्रा वाघांची कोणावर जिव्हारी लागणारी टीका?.
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?
उद्यापासून विशेष अधिवेशन, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद कोण भूषवणार?.
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'
'तोंडाला सत्तेचं रक्त लागल्यानं काहींना शिकार सोडाविशी वाटत नाही'.