Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रामदास कदमांकडून जमीन घोटाळा, अनिल परब यांचा घणाघाती आरोप

रामदास कदम यांनीच खेडचं प्रकरण सोमय्यांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. त्यामुळे आता कदमांचं हे प्रकरण सोमय्यांनीच तडीस न्यावं, अशी मागणी परब यांनी केली. येत्या काळात कदम यांचे 12 ते 13 घोटाळे मी बाहेर काढणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

रामदास कदमांकडून जमीन घोटाळा, अनिल परब यांचा घणाघाती आरोप
अनिल परब यांचा रामदास कदमांवर आरोप
Follow us
| Updated on: Apr 02, 2024 | 4:12 PM

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यातील वैर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रामदास कदम यांच्याकडून जमीन घोटाळा झाल्याचा आरोप ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी केला. कदमांचा घोटाळा बाहेर काढत सर्व पुरावे किरीट सोमय्यांना देणार, हिंमत असेल तर त्यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा करावा. रामदास कदम आणि त्यांच्या दोन्ही मुलांना आत ( तुरूंगात) टाकावं . याप्रकरणी ईडी चौकशी करण्याची मागणीही सोमय्यांनी करावी, असं आव्हानही परब यांनी दिलं. तसेच येत्या काळात कदम यांचे 12 ते 13 घोटाळे मी बाहेर काढणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

आजच्या पत्रकार परिषदेत अनिल परब यांनी रामदास कदमांवर कडाडून हल्ला चढवला. रामदास कदम यांनी शासकीय पदाचा वापर करुन गैरव्यवहार केला . स्वत: काचेच्या घरात रहायचं आणि दुसऱ्यांच्या घरावरती दगड मारायचं काम रामदास कदम यांनी केलंय. त्यांनी स्वत:च्या सख्ख्या भावाला देखील सोडलेलं नाही, आमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, असा आरोपही अनिल परब यांनी केला. आता काचेची घर कशी फटाफट फुटतील ते बघा, असा इशाराच त्यांनी दिला.

काय म्हणाले अनिल परब ?

रामदास कदम मंत्री होते, विरोधी पक्षनेते होते, आमदार होते. त्यांच्या मुलाला प्रदूषण महामंडळ दिलेलं आहे, जे निकषात बसत नाही. तरीही दिलेलं आहे. पूररेषेच्या आतमध्ये असलेलं बांधकाम महामंडळाच्या अध्यक्षांनी केलेलं आहे. त्यांनी आपल्या शासकीय पदाचा वापर करून त्यांनी घोटाळे केले. असे विविध 12 ते 13 घोटाळे मी येत्या कालावधीत बाहेर काढेन. किरीट सोमय्यांनी याची दखल घ्यावी, असे ते म्हणाले.

कदम यांनी स्वत:च्या भावाला देखील सोडलेलं नाही, आमची राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. किरीट सोमय्यांकडे ही सर्व प्रकरणं मी पाठवतं आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी या सर्व प्रकरणांचा पाठपुरावा करून रामदास कदम यांना आत ( तुरूंगात) पाठवावं, अशी मागणी अनिल परब यांनी केली. त्याचबरोबर मुंबईतील एसआरए घोटाळे, मुंबईतील भानगडी, प्रदूषण मंडाळाचा अध्यक्ष असताना केलेले घोटाळे, या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करण्याची गरज आहे.

किरीट सोमय्या महाराष्ट्रातील अण्णा हजारे

”आम्हाला बघायचंय सोमय्यांची किती ताकद आहे, कदमांच्या विरोधात काय करतात ते बघूयात. रस्त्यासाठी १५ गुंठे जागा दिली परंतु १८ गुंठ्याचे पैसे घेतले.. मंत्रिपदाचा गैरफायदा घेतला. त्यामुळे कदमांवर कारवाई झाली पाहिजे. सोमय्या हे महाराष्ट्राचे तथाकथित अण्णा हजारे आहेत, यात लक्ष घालतील का, हाच प्रश्न आहे.”

किरीट सोमय्या यांनी महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्याची सुपारी घेतली आहे. ते सतत भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या पाठिशी लागलेले असतात, म्हणून आम्ही त्यांना या प्रकरणांचे पुरावे देत आहोत. आम्हाला बघायचंय सोमय्यांची किती ताकद आहे, कदमांच्या विरोधात काय करतात ते पाहूयात. सोमय्या हे महाराष्ट्रातले तथाकथितअण्णा हजारे आहेत, असा टोलाही अनिल परब यांनी हाणला. ते या प्रकरणात लक्ष घालतील का, हाच प्रश्न आहे, असेही परब म्हणाले.

खेडच्या रिसॉर्ट प्रकरणात रामदास कदम यांनी फार मोठा पुढाकार घेतला होता. हे बांधकाम चुकीच्या प्रकारे झालंय, असं रामदास कदम यांनीच सोमय्यांना सांगितलं होतं. त्यानंतर तथाकथित भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी किरीट सोमय्यांनी ते प्रकरण लावून धरलं होतं. म्हणून आम्ही आता किरीट सोमय्या यांच्याकडेच रामदास कदमांची ही प्रकरणं पाठवत आहोत, की तुम्हीच आता त्यांची चौकशी करा. यांनी शेण खाल्लंय, तेच दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेतात. म्हणून आमची इच्छा आहे की सोमय्या यांनीच या प्रकरणात लक्ष घालावं, असं अनिल परब म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

किरीट सोमय्या यांनी माजी मंत्री अनिल परब यांच्यावर साई रिसॉर्टप्रकरणी गंभीर आरोप केले होते. यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचं देखील त्यांनी यापूर्वी म्हटलं होतं. त्यावरून प्रकरण बरंच तापलं होतं.

हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?
हीच ती जागा जिथं पर्यटकांवर गोळ्या, अंगावर काटा येणारा व्हिडीओ पाहिला?.
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी
दहशतवाद्यांना भारताचं स्पिरिट कधीच मोडता येणार नाही - पंतप्रधान मोदी.
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?
प्रत्येक दहशतवाद्याला शोधून...पहलगामच्या हल्ल्यानंतर मोदी काय म्हणाले?.
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने
पाकिस्तान हायकमिशनबाहेर जोरदार घोषणाबाजी आणि निदर्शने.
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.